संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविकांची गर्दी 

दत्ता म्हसकर
शनिवार, 2 जून 2018

अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथील श्री गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आज (ता. 02) भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली. उन्हाळी सुट्ट्या व अधिक मास यामुळे गर्दी अधिक आहे.

जुन्नर - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथील श्री गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आज (ता. 02) भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली. उन्हाळी सुट्ट्या व अधिक मास यामुळे गर्दी अधिक आहे.

देवस्थानच्या वतीने दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे देवस्थानचे विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर, पूजा व आरती झाली. यावेळी, देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभरात देवस्थानचे अध्यक्ष गोविंदराव मेहेर, सेक्रेटरी शंकरराव ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर गडदे, प्रभाकर जाधव, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे उपस्थित होते तसेच दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक व जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. 

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. देवस्थानचे वतीने अल्प दरात महाप्रसाद दिला जातो. सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, रात्री चंद्रोदयाच्या वेळी गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: crowd of devotees at shri kshetra lenyandri