#SaathChal संत सोपानकाकांच्या दर्शनासाठी भावीकांची गर्दी

#SaathChal संत सोपानकाकांच्या दर्शनासाठी भावीकांची गर्दी

वडगाव निंबाळकर : संत सोपानकाका पालखीचे बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, कोऱ्हाळे बुद्रुक गावात स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी ठिक ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. टाळ मृदंगाचा ध्वनी.. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... यासह विठ्ठल नामाचा गजराने परिसर न्हाउन निघाला.

सोरटेवाडी येथे शनिवार (ता.14) सकाळी झालेल्या पादुका पुजना नंतर पालखी सोहळा होळ आठफाटा येथे आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतिने सोमेश्र्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते, संतोष होळकर, बच्चन आटोळे, उत्तम होळकर, आबाजी वायाळ, पंडीतराव होळकर, एलके होळकर, पालखीच्या स्वागतासाठी होते. दहाफाटा येथील आनंद विद्यालयाजवळ पालखीने विसावा घेतला यावेळी सोमेश्र्वरचे माजी संचालक आनंतकुमार होळकर, सरपंच विलासराव होळकर, प्रमोदकुमार गिते, बाळासो होळकर, बापुराव सुर्यवंशी, पोलिस पाटील विजयकुमार लिंबरकर यांनी स्वागत केले. 

चोपडज, वाकी, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी परिसरातील भावीकांनी दर्शन घेतले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पालखी वडगाव निंबाळकर येथील सावतामाळी मंदिरात आली यावेळी सावतामाळी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतिने माजी सरपंच सुनिल ढोले, जिवन बनकर, दत्तात्रेय गिरमे, दत्ता बनकर, विजय हिरवे, हनुमंतराव बनकर मारूती बनकर यांनी स्वागत कोऱ्हाळे बुद्रुक गावच्या सिमेवर पेशवे वस्तीवर ग्रामस्थांनी फटाके वाजवुन स्वागत केले. पंचायत समिती सदस्य बापुराव धापटे, सरपंच शैला भगत, उपसरपंच शारदा कदम, भाग्यावन चव्हाण, गुलाब कचरे, बजाबापु माळशिकारे, रविंद्र खोमणे, डिजी माळशिकारे, दत्तात्रेय गावडे, उपस्थित होते. 

नगर प्रदिक्षणा करून पालखी सिद्धेश्र्वर मंदिरात मुक्कमासाठी थांबली. यावेळी ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पालखी सोहळाप्रमुख गोसावी यांनी ठिक ठिकाणचे स्वागत स्विकारले गेल्या वर्षीच्या तुलनेत दिड्यांमध्ये वाढ झाली आहे. कोऱ्हाळे बुद्रुक येथुन पालखी रविवार (ता. 15) सकाळी माळेगाव शिवनगरकडे मार्गस्त झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com