सांस्कृतिक आव्हान पेलण्यासाठी तरुणांनी पुढे यावे - डॉ. सबनीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - ""सांस्कृतिक आव्हान पेलण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. चांगले साहित्य फक्त पुण्या-मुंबईत जन्माला येत नसून, ते भटक्‍या तांड्यातही जन्म घेत असते. युवकांनी घडवलेल्या परिवर्तनाची देशाला सातत्याने गरज आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.

"अग्निपंख'च्या वतीने आयोजित केलेल्या युवा मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, सचिन इटकर, ज्ञानेश्वर मोळक, संकेत पडवळ, हनुमंत पवार आदी उपस्थित होते. डॉ. सबनीस म्हणाले, ""विविध महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. आपण विभागणी केलेल्या या महापुरुषांना एकत्र करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.'' वैद्य म्हणाले, ""देशात सध्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा बिकट आव्हान तरुणांसमोर आहे. त्या आव्हानाला तोंड देताना परिणामी स्वकियांच्याही विरोधात जाण्याची तयारी त्यांनी ठेवायला हवी.''