सम्राज्ञी ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील सम्राज्ञी ग्रुपच्या वतीने नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात 'जात्यावरची ओवी व आयुर्वेद पावलोपावली' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओव्या आणि आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि आजही त्याचा आपल्या सुदृढ आरोग्याशी असलेला सहसंबंध या निमित्ताने या ग्रुपमधील कलाकारांनी प्रस्तुत केला. 

मंगळागौरीचे पिंगा, गोफ यासारखे खेळ, जोगवा नृत्य, बाळांत विड्याचे महत्व सांगणारी वैदीन यातून पुर्वीच्या स्त्रिया मनोरंजनातून आरोग्य जपत असल्याचे दाखविण्यात आले. सूप, उखळ, जात यासारख्या वस्तु हाताळत त्याला पूरक असणाऱ्या ओव्याही ऐकवण्यात आल्या. आणि हे सादर करण्यासाठी नृत्य व लोकगीतांचाही यात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ' कानाखाली गणपती काढेन ' या विनोदी एकांकीतून अंधश्रध्दे संबंधी जागृती करण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमाचे दिग्दर्शन वसुधा गोडसे तर संगित संयोजन ईशांत गोडसे या बाल सिनेकलाकाराने केले.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन दत्ता तांदळे यांनी केले, शर्मिला चिटणिस, मंजूषा होनराव, शुभम करार, सुजाता चवज, कल्याणी भंवर या कलाकारांबरोबर स्वानंद गाडकवाड अन्वेषा चवज या बालकलाकारांनी उत्तम अभिनय केला. 

Web Title: cultural program organised by samradnyi group