शहरात दहीहंडीची लगबग

शहरात दहीहंडीची लगबग

पुणे - श्रीकृष्णाच्या मूर्ती व हंड्या खरेदीचा आनंद पुणेकरांनी शनिवारी घेतला. आज (ता. २) जन्माष्टमी असून, सोमवारी (ता. ३) गोपाळकाला अर्थातच दहीहंडी आहे. त्यामुळे श्रीकृष्ण मंदिरांत तसेच गणेश मंडळे, दहीहंडी उत्सव समितीतर्फे दहीहंडी उत्सवाच्या तयारीत कार्यकर्ते व्यग्र होते. 

महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर व कुंभारवाडा येथे शनिवारी सकाळपासून राधा-कृष्णाच्या मूर्ती, शिंकाळे, दोरखंड, मातीच्या रंगीबेरंगी हंड्या खरेदी करण्यासाठी गर्दी होती. विक्रेत्या पूजा सासवडकर म्हणाल्या, ‘‘गुजरात, राजस्थानवरून हंड्यांसाठी माती मागवितो. रंगीबेरंगी हंड्यांना मागणी अधिक असते. ५० रुपयांपासून साडेपाचशे रुपयांपर्यंत आकर्षक हंड्या उपलब्ध आहेत.’’ 

दशानेमा व विशानेमा या गुजराती समाजातील नागरिकांमध्ये श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव प्रामुख्याने असतो. याबाबत विशानेमा समाजातले व्यावसायिक बिपिन मोदी म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण जल्लोषात साजरा होतो. येथे स्थायिक झालेले गुजराथी नागरिक घरोघरी व समाजाच्या श्रीकृष्ण मंदिरांत रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करतात. घरोघरी देवाला पंजरी व सुंठवड्याचा नैवेद्य असतो.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com