टोळक्याकडून नऊ वाहनांची तोडफोड 

auto
auto

पिंपरी (पुणे)  : दहशत निर्माण करण्यासाठी दहा जणांच्या टोळक्याने नऊ वाहनांची तोडफोड केली. ही घटना निगडीतील अजंठानगर भागात शनिवारी रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता आरोपींची येथील काही जणांशी सोबत भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास आरोपी हातात कोयते तलवारी व नकली पिस्तुल घेऊन अजंठानगर परिसरात आले. त्यांनी सहा रिक्षा एक मोटार व दोन दुचाकींचे नुकसान केले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय २०), रोहित नवनाथ सोनवणे (वय २७), योगेश सोनावणे (वय २२), गौतम नवनाथ सोनावणे (वय २४), विशाल सोनावणे (वय २४), विनोद उर्फ निम्मा सोनवणे (वय १९), विशाल गायकवाड (वय २३),  अशोक झेंडे (वय २०), ऋषिकेश वाघमारे (वय २३), मयूर रामपुरे (वय २५), संकेत घिसरे व मनोज पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सोमनाथ भारत शिंदे (वय २५ रा. जय बजरंग हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना सपशेल अपयश  आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com