बहिणीच्या मित्राचा मृत्यू; एकाला दहा वर्षे शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - बहिणीच्या मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांनी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला. 

आकाश मुकेश शेलार (वय 21, रा. नांदेड, सिंहगड रस्ता) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर विशाल गजानन भिसे (वय 28, 

रा. गोखलेनगर) याचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयाने तांत्रिक मुद्‌द्‌यावर खुनाऐवजी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कलमांतर्गत आरोपी आकाशला शिक्षा सुनावली. या खटल्यात अतिरिक्‍त सरकारी वकील जावेद खान यांनी 12 जणांची साक्ष नोंदविली. याप्रकरणी मयताचे भाऊ लक्ष्मीकांत गजानन भिसे (वय 20, रा. गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली होती. हा गुन्हा ऑक्‍टोबर 2014 मध्ये राजाराम पुलाजवळ रात्री सव्वादहाच्या सुमारास घडला होता. 

आरोपी शेलार याची बहीण आणि मयत विशाल यांची मैत्री होती. त्यास आकाशचा विरोध होता. विशाल त्यांच्या घरी आणि दुकानात जात असे. हे आकाशला पसंत नव्हते. घटनेच्या दिवशी विशाल आणि तिने आकाशला जेवणासाठी बोलावून घेतले. त्या वेळी आकाश आणि विशाल यांच्यात शाब्दिक वाद झाले. यातून आकाशने त्याच्याकडे असलेल्या चाकूने विशालच्या छातीत भोसकले आणि दंडावर वार केला. यात आरोपीची बहीणही जखमी झाली होती. तेथून पळून जाणाऱ्या आकाशला पाठलाग करून पकडले होते. विशालला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले होते. 

टॅग्स