देहूरोडमध्ये टोळक्‍याची तोडफोड

मुकुंद परंडवाल
शनिवार, 26 मे 2018

देहू - देहूरोड शहरातील पारशीचाळ, अबुशेठ रस्त्यावर शुक्रवारी (ता.25) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टोळक्‍याने गोंधळ घालत वाहने व दोन एटीएमची तोडफोड केली. सलग दुसऱ्या दिवशीही तोडफोड झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी (ता.24) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पारशीचाळ, अबुशेठ रस्त्यावर टोळक्‍याने वाहने फोडली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास टोळक्‍याने वाहने आणि दोन बॅंकेच्या एटीएमची तोडफोड केली. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन युवक दुचाकीवरून पारशीचाळ येथे आले. त्यावेळी तेथील जमाव या युवकांच्या मागे लागला. त्यातूनच हा प्रकार घडला. आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळेगाव, देहूरोड येथील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: dehuroad news todfod