डेपोत कचरागाडी येऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

फुरसुंगी - पुणे महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा डेपोला शुक्रवारी (ता. १४) पहाटे लागलेली भीषण आग अद्यापही नियंत्रणात आलेली नसून, परिसरातील गावांत, वाड्यावस्त्यांमध्ये धूर पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. पाच अग्निशमन बंब व दहा टॅंकर यांच्या मदतीने महापालिका आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत आहे. दरम्यान, यापुढे एकही कचरा गाडी डेपोवर येऊ न देण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 

कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे, नगरसेविका वैशाली बनकर, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, पंचायत समिती सदस्या रोहिणी राऊत, सचिन घुले, दत्ता राऊत, तात्यासाहेब भाडळे यांनी शनिवारी (ता. १५) डेपोला भेट दिली. 

भाडळे म्हणाले, ‘‘८ जानेवारी २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांबरोबर पुण्यात झालेल्या बैठकीत स्वत: मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते, की नऊ महिन्यांत नवीन जागा शोधू, पण अद्यापही नवीन जागा शोधलेली नाही. तसेच डेपोतील हंजर व दिशा हे कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे यापुढे आम्ही कचरा गाड्या डेपोत येऊ देणार नाही.’’ दरम्यान, महापालिकेचे घनकचरा विभाग प्रमुख सुरेश जगताप यांनीही डेपोला भेट दिली.

Web Title: Depot will not be garbage vehicle