विकासकामे मतदारांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

हडपसर - मुंढवा- मगरपट्टा सिटी (प्रभाग २२) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी मगरपट्टा सिटी, लोहियानगर, कांचनगंगा सोसायटी, भीम पार्क सोसायटी, पी. एस. टॉवर, सुंदर संकुल, सुंदर आकाश सोसायटी, माऊलीनगर, ज्ञानदीप सोसायटी, वेद विहार, शांती निकेतन, सिटी पॉइंट सोसायटीमध्ये मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेऊन प्रचार केला. या वेळी राष्ट्रवादीने केलेल्या विविधकामांचे पत्रक मतदारांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या प्रभागातून माजी महापौर चंचला कोद्रे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, हेमलता नीलेश मगर तसेच शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष चेतन तुपे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांकडून या उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले जात होते. 

राष्ट्रवादी पक्षाचा हा बालेकिल्ला राहिल्याने या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून रस्ते, शाळा, उद्याने, सांडपाणी वाहिन्या, स्ट्रीट लाइट, पाणी, प्रा. ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यान, कै. खासदार विठ्ठलरावजी तुपे सांस्कृतिक भवन, शूटिंग रेज, मोहन धारिया पर्यावरण उद्यान आणि भोसले गार्डन येथे जॉगिंग ट्रॅक, क्रीडांगण उभारण्यात आले आहे. मगरपट्टा सिटीच्या बाजूला ‘एचसीएमटीआर’ रस्ता तयार केला असून, भारत फोर्ज कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

मगरपट्टा रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण सुरू आहे. मगरपट्टा पुलाखाली सुशोभीकरण करणे, कै. अण्णासाहेब मगर रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याची कामे प्रस्तावित आहेत, असे उमेदवारांनी सांगितले. त्याचबरोबर मगरपट्टा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मगरपट्टा चौक ते मुंढवा गाव दरम्यान समांतर रस्ता तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. मतदारांनी या निवडणुकीत पूर्वीप्रमाणे मतदान करून संधी द्यावी, असे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते.

पुणे

पुणे - अकरावी प्रवेशाच्या खुल्या ऑनलाइन फेरीत आज गट क्रमांक एकमधील (80 ते 100 टक्के गुण मिळालेल्या) 93 विद्यार्थ्यांना...

12.12 AM

पुणे  - शहरातील बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या बंटी-बबली या जोडीसह त्यांच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या...

12.12 AM

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017