मधुमेह आणि योगसाधना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सर्वच प्रकारची योगासने मधुमेहासाठी उपयोगी आहेत. विशेषतः पोटावर ताण, दाब, पीळ देणारी योगासने उदा. पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, शलभासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, योगमुद्रा, त्रिकोणासन वगैरे. मात्र, यामध्ये ‘स्थिरसुखम आणि प्रयत्नशैथिल्य’ या तंत्राप्रमाणे योगासने करावी. यामुळे आसनांचे शरीरातील वरवरचे ताण आतल्या इंद्रियापर्यंत पोचून अंतःस्रवी ग्रंथीपर्यंत पोचतात व स्वादुपिंडातील इन्सुलिनची निर्मिती वाढते. 

प्राणायाम
प्राणायामचा अभ्यासक्रम मात्र शास्रसुद्ध आणि दीर्घकाळ करणे आवश्‍यक आहे. ‘स तु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासेवितो दृषभूमिः।। यामध्ये विशेषतः अनुलोम विलोम, नाडिशुद्धी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, भस्तिका प्राणायाम याचा अभ्यास त्रिबंधांसहित कुंभक करून करणे आवश्‍यक आहे. यामुळे इन्सुलिन चांगले निर्माण होते. मात्र हे कसे होते हे सांगणे अवघड असून त्यावर संशोधन सुरु आहे.

शुद्धिक्रिया
मधुमेहाच्या उच्चाटनासाठी शुद्धिक्रियांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. यात विशेषत्वाने अग्रिसारधौती, कपालभाती अत्यंत उपयोगी आहे. तसेच जलनेती आणि वमनही लाभदायक आहे. तसेच शंखप्रक्षालन ही शुद्धीक्रिया मधुमेहासाठी रामबाण इलाज आहे. या सर्व शुद्धिक्रियांमुळे अंतर्बाह्य शुद्धी होऊन सर्व अंतःस्राव सुरळीत चालू राहतात. जसे विहीराचा गाळ साफ केल्यावर झरे फुटतात. वमन शुद्धीमुळे पचन सुधारते. शंखप्रक्षालनामुळे पूर्ण अन्नमार्ग पचन-उत्सर्जन शुद्धी होते. अग्निसार व कपालभातीमुळे प्रत्यक्ष पॅक्रियाजवर परिणाम होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून इन्सुलिन कार्यान्वित होते. 
 
ध्यान व योगनिष्ठा
आजच्या धावपळीच्या युगामध्ये बहुसंख्य लोकांना मधुमेह हा मानसिक ताणामुळे झालेला असतो. यावर ध्यान आणि योग हीच उपयुक्त प्रक्रिया आहे. ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता, मनःशांती. यातूनच ताणतणाव कमी होऊन इन्सुलिन निर्मितीवर झालेले दुष्परिणाम निघून जातात. यासाठी ‘ओंकारध्यान’ आणि ‘पॅक्रियाजवर केलेले ध्यान’ उपयुक्त आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्‍यक आहे. 

मात्र, योग म्हणजे चमत्कार आहे असे समजू नका. कारण काही रुग्णांमध्ये स्वादुपिंडामध्ये बीट पेशीच नसतात किंवा त्यांच्यात इन्सुलिन तयार करण्याची क्षमताच नसते. अशा स्थितीतील मधुमेहाला ‘ज्युव्हेनाईल डायबेटीस’ असे म्हणतात. अशा रुग्णांवर योगाचा काहीही परिणाम होत नाही. त्यांना आयुष्यभर इन्सुलिनच्या इंजेक्‍सनवरच जगावे लागते. पण असे रुग्ण फक्त पाच टक्के असतात. इतर ९५ टक्के रुग्णावर मात्र योगशास्राचा निश्‍चित परिणाम होतो.