अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची 'दिवाळी'!

संतोष शाळिग्राम : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पुणे - एकीकडे "मार्केट डाऊन' असल्याची चर्चा ऐकायला मिळत असतानाच पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत सुरू असलेल्या "कॅंपस इंटरव्हू'मध्ये विद्यार्थ्यांना तीन लाखांपासून 36 लाख रुपये वार्षिक पगाराचे "पॅकेज' मिळाले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.

पुणे - एकीकडे "मार्केट डाऊन' असल्याची चर्चा ऐकायला मिळत असतानाच पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत सुरू असलेल्या "कॅंपस इंटरव्हू'मध्ये विद्यार्थ्यांना तीन लाखांपासून 36 लाख रुपये वार्षिक पगाराचे "पॅकेज' मिळाले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी (पीआयसीटी) या महाविद्यालयातील विद्यार्थ्याला सर्वाधिक 36 लाखांचे वार्षिक वेतन मिळाले आहे. त्या खालोखाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतील (सीओईपी) विद्यार्थ्यांना 29.50 लाख रुपयांचे, तर विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (व्हीआयटी) विद्यार्थ्याला 16.17 लाखाचे वार्षिक वेतन मिळाले आहे. सुट्यानंतर मुलाखतीची दुसरी फेरी अपेक्षित असल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे.

"व्हीआयटी'तील प्लेसमेंट सेलचे प्रमुख ए. एस. कुलकर्णी म्हणाले, ""विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर उत्पादने आणि नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या कंपन्या आहेत. बॅंक आणि वित्तसंस्था यांची संख्यादेखील मोठी आहे. या संस्था वा कंपन्या त्यांची इंटरनेट सुरक्षा स्वत: तयार करतात. त्यासाठी त्यांना मनुष्यबळ लागते. या कंपन्यांचे पॅकेज दहा लाखांच्या पुढे आहे.''

"सीओईपी'तील "प्लेसमेंट सेल'चे उत्तम चासकर आणि डॉ. संदीप मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार, ""डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या योजनांतर्गत उद्योजक आता नावीन्यपूर्ण संशोधनावर भर देत आहेत. त्यासाठी त्यांना संगणक ज्ञान असणारे बुद्धिमान मनुष्यबळ हवे आहे. याच कंपन्या चांगल्या वेतनाची संधी देत असून, आमच्या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यास एका बहुराष्ट्रीय कंपनीने 29.50 लाखांचे पॅकेज दिले आहे.''

चार विद्यार्थ्यांना 36 लाखांचे पॅकेज
"पीआयसीटी'तील प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक गिरीश मुंदडा यांनी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांना एका जपानी कंपनीने 36 लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊ केल्याची माहिती दिली. ते म्हणाल्या, ""कंपन्यांना केवळ शैक्षणिक बाबतीत हुशार विद्यार्थी नकोत. त्यांचे सामान्य ज्ञान, सोशल मीडियावरील वागणूक, खिलाडू वृत्ती, आव्हाने स्वीकारणे आणि पराभव पचविण्याची क्षमता आदींना कंपन्या महत्त्व देऊ लागल्या आहेत.''

 

Web Title: Diwali celebration by Engineering students