दुर्गमभागातील विद्यार्थ्यांसाठी सायकलदान महाअभियान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

महाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी (पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी "सायकलदान महाअभियान" राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सायकल संकलन शिबिराचा दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 15 जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती अभियानाचे मुख्य संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी दिली.

पुणे : महाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी (पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी "सायकलदान महाअभियान" राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सायकल संकलन शिबिराचा दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 15 जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती अभियानाचे मुख्य संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी दिली.
 

राज्याच्या अनेक भागात आदिवासी, भटके विमूक्त व आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत. या धडपडीला अधिक बळ देण्यासाठी प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी व टिम एकलव्य कार्यरत आहे. त्यानुसार जानेवारी 2018 पासुन सोशल मिडीयाच्या माध्यमांतून या मोहिमेला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीचे मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोले (जि.अहमदनगर) या आदिवासी तालुक्यात 15 विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यात 5 सायकलींचे वाटप करण्यात आले. अकोलेमधील आदिवासी व जामखेडमधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकरिता जुलै महिन्यात सायकल वितरण केले जाणार आहे. सायकलदान महाअभियानच्या वतीने राज्यातील 500 विद्यार्थ्यांपर्यंत सायकलरूपी मदत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजातील समाजभान जपणाऱ्या दानशूर पूणेकरांनी सढळ हाताने मदत करण्याचे अवाहन अभिषेक कांबळे यांनी केले आहे. 

सायकलदान महाअभियान या मोहिमेअंतर्गत सायकल संकलनाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ मुंबई येथून दि 26 व 27 मे रोजी झाला. पहिल्या टप्प्यात मुंबई मधील चार सायकल संकलन केंद्रातून 55 जुन्या व नव्या सायकलींचे संकलन करण्यात यश आले. दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 15 जूनपर्यंत चालणार आहे. ज्या नागरिकांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्याकडील सुस्थितीतील वापरण्यायोग्य (दुरूस्त केलेली) सायकल किंवा नवीन सायकल देऊन मदत करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ज्या नागरिकांना या मोहिमेसाठी थेट आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी ● Prayogvan Pariwar Samajik Sanstha ● Bank Of Maharastra 
● Branch - Jamkhed  
● AC No - 60305163441
● MIRC code - 414014507
● IFSC CODE - MAHB0001865 या खात्यावर आपली मदत जमा करावी किंवा 
संयोजक सत्तार शेख 9130138973 / 7875753550 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सायकलदान महाअभियानच्या वतीने करण्यात आले आहे. 

सायकलदान महाअभियानमध्ये योगदान देऊ इच्छिणार्‍या दात्यांनी (1) हडपसर - चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर, लोहिया उद्यान शेजारी, मगरपटा चौक, हडपसर, संपर्क - अमृता मगर - 9769003570 (2) कोथरूड -  गांधी भवन, महात्मा गांधी स्मारक निधी, चैतन्य नगर, कोथरूड, संपर्क - अतुल - 70404 55186
 (3) नवी पेठ - शांतिवन कार्यालय 35 / बी फडकेबाग कॉलनी, वैकुंठ स्मशानभूमी जवळ, नवी पेठ -  विजय जोशी - 9881473710 (4) पिंपरी चिंचवड - समाधान पाटील 9028972975 (5) किशोरी अग्नीहोत्री 94222 62499 (6) अभिषेक कांबळे 87961 20474 (7) यूनूस सय्यद (पुणे) - 73049 28897 यांच्याशी संपर्क साधून सायकलदान करावी असे अवाहन संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी केले आहे.

Web Title: donate baycycle for tribal students