महिलांवर होणार लैगिंक छळ थांबविण्यासाठी अाता ‘दुर्गा मंच’

दिलीप कुऱ्हाडे
गुरुवार, 17 मे 2018

पुणे- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी आता सरकारी राजपत्रीत अधिकारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. महासंघाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यात ‘दुर्गा मंच’ची स्थापना केली आहे. त्यामुळे सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठिकाणी महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिलांचा सर्पोट गट कार्यरत असणार आहे.

पुणे- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी आता सरकारी राजपत्रीत अधिकारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. महासंघाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यात ‘दुर्गा मंच’ची स्थापना केली आहे. त्यामुळे सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठिकाणी महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिलांचा सर्पोट गट कार्यरत असणार आहे.

राज्यातील सरकारी कार्यालयातील वर्ग एक व दोनच्या महिला अधिकाऱ्यांच्या महासंघाने कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी कंबर कसली आहे. महासंघाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यात दुर्गा मंचची स्थापना केली आहे. दुर्गा मंचमध्ये सरकारी विविध विभागातील अकरा महिलांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यत: महिला व बाल विकास, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभाग, जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, सरकारी रुग्णालयातील महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दुर्गा मंच राज्यातील सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालणे, महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे पाठविणे, महिलांना बालसंगोपनासाठी रजा देणे, पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठीचा सर्पोट गट म्हणून कार्यरत असणार आहे. ज्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठिकाणी महिला अत्याचार समित्या स्थापन झाल्या नाहीत किंवा ज्या समित्या निर्ष्कीय आहेत अशा समित्या पुन्हा कार्यरत करणे. या समित्यांच्या माध्यमातून अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी दुर्गा मंचचा पुढाकार असणार आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह महत्त्वाच्या बहुतेक जिल्ह्यात ‘दुर्गा मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. या दुर्गा मंचच्या राज्याच्या अध्यक्षा मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली कदम आहेत. तर पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला व बाल विकास आयुक्तालयातील सहायक आयुक्त सुवर्णा पवार आहेत.

पीडित महिलांना कामाच्या ठिकाणी असलेल्या लैंगिक प्रतिबंधक समितीमध्ये प्रतिसाद मिळत नसेल किंवा तेथील समिती कार्यरत नसल्यास त्यांनी ‘दुर्गा मंच’चे सहकार्य घ्यावे. त्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून दिला जाईल.’’
- सुवर्णा पवार, अध्यक्षा, पुणे जिल्हा, दुर्गा मंच

Web Title: 'Durga mancha' to stop sexual harassment on women