पुरंदर तालुक्यातील पिकांवर सावट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सासवड - येथील वीज उपक्रेंद्रातील १० एमव्हीए रोहित्र नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यातून सासवड शहराभोवतीसह सुमारे ३० गावांतील कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातही बोपगाव उपकेंद्र व फुरसुंगी केंद्राकडून वीज घेऊन हा भार हलका करण्याची कसरत वीज वितरण कंपनीला करावी लागत आहे. 

सासवड - येथील वीज उपक्रेंद्रातील १० एमव्हीए रोहित्र नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यातून सासवड शहराभोवतीसह सुमारे ३० गावांतील कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातही बोपगाव उपकेंद्र व फुरसुंगी केंद्राकडून वीज घेऊन हा भार हलका करण्याची कसरत वीज वितरण कंपनीला करावी लागत आहे. 

उपमुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र कामथे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सासवडचे वीज उपकेंद्र बरेच जुने आहे. तेथे सासवड शहर गावठाण व भोवतीचे तीस गावांचे गावठाण क्षेत्रासाठी एक १० एमव्हीए क्षमतेचा रोहित्र आहे. मात्र सासवड भोवतीच्या व लगतच्या ३० गावांच्या शेती क्षेत्रात कृषिपंपांच्या जोडण्यांना दिलेला वीजपुरवठा ज्यातून दिला जातो तो दुसरा १० एमव्हीए क्षमतेचा रोहित्र बुधवारपासून नादुरुस्त झाला आहे. ही बाब वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयास कळविली आहे. त्यातून कंपनीच्या बारामती कार्यालयाची यंत्रणा व खासगी कंत्राटदार यांच्यामार्फत दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे.  

सासवड हद्दीतील भोवतीच्या व लगतच्या ३० गावांच्या भोवतीच्या शेती क्षेत्रात कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यात घट आली आहे. या क्षेत्रासाठीचा दुसरा १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे बोपगाव (ता. पुरंदर) येथे गतवर्षी झालेल्या वीज उपकेंद्रातून व फुरसुंगी वीज केंद्राकडून वीज घेऊन ही घट काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या कसरतीतून बोपगावकडून दीड ते दोन एमव्हीए व फुरसुंगीकडून काही प्रमाणात वीजपुरवठा काही काळ उपलब्ध होतो. पण सातत्य नाही. 

पुन्हा बिघाड होण्याची शक्‍यता...
सासवड व ३० गावांतील शेती क्षेत्रातील अनेक कृषिपंपांना कमी दाबाने वा कधी कधी खंडित वीजपुरवठा होत आहे. उन्हाळी चारा पिके, भाजीपाला पिके, पाणी उपलब्ध असलेल्या भागातील इतर उन्हाळी पिकांच्या सिंचनात अडथळा येऊ शकतो. आता जरी दुसऱ्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची दुरुस्ती झाली, तरी पुन्हा नादुरुस्तीची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण वीज उपकेंद्रच आता जुने झाले आहे.

Web Title: electricity sub center agriculture