Encroachment removal campaign of Baramati Municipality
Encroachment removal campaign of Baramati Municipality

बारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम

बारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाबद्दल लोकांकडून होत असलेली टीका, माध्यमातून वारंवार याबाबत उठविलेला आवाज यांची दखल घेत आज बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने इंदापूर ते गुनवडी चौक तसेच गुनवडी चौक ते शिवाजी चौकातील तब्बल 250 छोटी मोठी अतिक्रमणे काढून टाकली. 

यातही फळ व भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना नवीन मंडईत हलविण्यात आले असून यापुढील काळात या रस्त्यावर फळे व भाजीपाला विक्रीस मनाई करण्याचाही निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. 
आज सकाळपासूनच अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. हे करताना कोणत्याही व्यावसायिकाचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली गेली. त्यामुळे या कारवाईला फारसा विरोध झाला नाही. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनील धुमाळ, राजेंद्र सोनवणे तसेच नगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. 

अनेक वर्षांपासून या रस्त्यावर सातत्याने अतिक्रमण होत होते, मात्र त्याकडे जुजबी कारवाई करुन दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतली जात होती. आता मात्र समाजाच्या सर्वच घटकातून दबाव वाढल्यानंतर मात्र नगरपालिकेने आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला गती दिली. इंदापूर चौक व गुनवडी चौकात अतिक्रमणामुळे वाहतूकीची कोंडी होणे व पादचाऱ्यांना व्यवस्थित चालताही न येणे अशा बाबी घडत असल्याने त्याबाबत नगरपालिकेवर सातत्याने टीका होत होती.

गुन्हे दाखल करणार 
ठराविक लोकांच्या अतिक्रमणामुळे होणारी कोंडी दूर करण्यासाठी आता कडक कारवाईचे पाऊल उचलण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या पुढील काळात अतिक्रमण करणाऱ्यांविरुध्द पोलिसात थेट गुन्हे दाखल करण्याचाच निर्णय घेण्यात आला असून कायदेशीर कारवाईही प्रशासन करणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com