मित्रांच्या सहवासातून मिळाली ऊर्जा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

पुणे - ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या संसदेतील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांच्या महाविद्यालयीन काळातील मित्रांनी त्यांचा हृद्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. या समारंभात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी ‘मैत्री केक’ कापून पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

पवार म्हणाले, ‘‘राजकीय धकाधकीच्या काळात मित्रांबरोबर घालवलेला वेळ, त्यांच्याबरोबर प्रवासात मिळणारा विरंगुळा यातून मी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतो. त्यामुळेच देशात वा परदेशात कोठेही असलो तरी मित्रांसाठी मी आवर्जून वेळ काढतो. त्यातून मला नवी ऊर्जा मिळते.’’ 

‘‘वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असणारे आणि आपल्या कर्तृत्वाने उंची गाठणाऱ्या या मित्रांचा मला अभिमान आहे. केवळ शुद्ध मैत्रीच्या भावनेने एकत्र येणारे हे माझे मित्र माझ्यावर निस्सीम आणि निःस्वार्थी प्रेम करतात. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता मी माझ्या कार्यात यशस्वी व्हावे, याच एका भावनेने ते मला मदत करत असतात आणि त्याचमुळे आमची मैत्री वर्षानुवर्षे केवळ टिकूनच नव्हे, तर वृद्धिंगतही होत राहिली,’’ असेही ते म्हणाले.

या वेळी प्रतिभा पवार यांचाही सत्कार करण्यात आला. अजय शिर्के यांच्या हस्ते पवार यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमास राहुल बजाज, गौतम अदाणी, बाबा कल्याणी, हर्ष नेवेटीया, सुशीलकुमार शिंदे, विनायकराव पाटील, डॉ. शां. ब. मुजुमदार, माधवराव आपटे, डॉ. के. एच. संचेती, श्रीनिवास पाटील, विजय शिर्के, जब्बार पटेल, मोहन आगाशे, लीला पूनावाला, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

Web Title: energy received by friends society