इंजिनिअरिंग सीईटीचा निकाल ३ जूनला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल 3 जून रोजी दुपारी तीननंतर जाहीर होणार आहे. दहा मे रोजी ही परीक्षा झाली होती.

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल 3 जून रोजी दुपारी तीननंतर जाहीर होणार आहे. दहा मे रोजी ही परीक्षा झाली होती.

निकालानंतर होणाऱ्या प्रवेश फेऱ्यांवेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांना दिलासा देणारा बदल यावेळी करण्यात येत आहे. प्रवेश फेऱ्यांवेळी ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आता स्कॅनिंग करून अपलोड करावी लागणार आहेत. अनेकदा प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडील मूळ  यंत्रणा वा महाविद्यालयांकडे अडकून पडतात. पण ही कागदपत्रे विद्यार्थ्यांकडेच असावीत म्हणून कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले जाणार आहे, असे सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सकाळला सांगितले.

Web Title: Engineering CET Result is 3 June