‘ईएसआय’च्या कपातीचा टक्का वाढला

ESIC
ESIC

पुणे - मासिक २१ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आता ‘कर्मचारी राज्य विमा निगम’पोटी (एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन-ईएसआय) १.७५ टक्के रक्कम कपात केली जाणार आहे. तर कंपनीकडून ४.७५ टक्के रक्कम कपात केली जाणार आहे. या रकमेतून संबंधित कामगार व त्याच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्यसेवा देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

यासंदर्भात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ६ ऑक्‍टोबर २०१६ मध्ये अधिसूचना काढली होती; परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. एक सप्टेंबरपासून ही नवीन कपात लागू करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व कारखाने, आस्थापनांमधील व्यवस्थापनाचा अंशदानाचा टक्का ३ टक्‍क्‍यांवरून ४.७५ टक्के, तर कामगाराच्या पगारातील १ टक्‍क्‍यावरून १.७५ रक्कम कपात केली जाणार आहे. 

नुकत्याच मान्य केलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सामाजिक सुरक्षितता व रोजगारनिर्मितीसाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजने(पीएमआरपीवाय)अंतर्गत कामगारांच्या एकूण पगाराच्या १२ टक्के भविष्य निर्वाह निधीची (प्रॉव्हिडंट फंड) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘कर्मचारी राज्य विमा निगम’पोटी (एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन - ईएसआय) पगारातून कपातीची मर्यादा वाढविण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. या रकमेतून संबंधित कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा, शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराचा लाभ देण्यात येणार आहे.

निर्णय कोणासाठी?
    मासिक २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेले कामगार
    कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्या 
    देशभरातील ८ कोटी ८९ लाख कंपन्या 
    १२ कोटी ४० लाख कामगारांना होणार फायदा
    ‘ईएसआय’ची १६० रुग्णालये आणि १४८९ आरोग्य केंद्रांमध्ये मिळणार सेवा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com