द्रुतगती मार्गावर सहा वाहनांना अपघात

भाऊ म्हाळस्कर
शनिवार, 26 मे 2018

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. ही घटना शनिवारी (ता.26) दुपारी घडली. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला. अपघातामुळे अर्धातास वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. ही घटना शनिवारी (ता.26) दुपारी घडली. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला. अपघातामुळे अर्धातास वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

 
खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, द्रुतगतीवर फुडमॉलजवळ तीव्र उतार व वळणामुळे भरधाव वेगात असलेल्या चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे सहा वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये चार मोटारी, ट्रक व कंटेनरचा समावेश आहे. अपघातात मोटारींचे बरेच नुकसान झाले आहे. एका वाहनचालकाच्या पायास दुखापत झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धातास विस्कळित झाली होती. लोणावळ्यात वाहनांच्या रांगा वाहतूक नियंत्रणासाठी लोणावळ्यात तीनच कर्मचारी असल्याने वाहतुकीवर ताण आला होता. 

दरम्यान उन्हाळी सुट्या तसेच विकेंडमुळे पर्यटकांच्या गर्दीमुळे बोरघाटात पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतुकीवर ताण आला. हंगामाच्या सुरवातीस वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळ्यात वाहनांच्या अपोलो गॅरेज ते मुनीर हॉटेलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहने खालापूर टोलनाक्‍याजवळ थांबविल्याने वाहतुकीची अधिक कोंडी टळली.

Web Title: express way accident triffic jam