फर्ग्युसन रस्त्याला ‘कॅशलेस’ची प्रतीक्षाच!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

पुणे, ता. ३१ : नागरिकांनो, जरा इकडे लक्ष द्या !... तुम्ही फर्ग्युसन रस्त्यावर खरेदीसाठी जाणार आहात का? मग आपल्या खिशात पुरेशी रोख रक्कम नक्की बाळगा. काय म्हणालात, तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे. अहो, ते असलं तरीही उपयोग नाही. कारण, ते कार्ड विक्रेत्यांकडे चालायला हवं ना!... फळं, भाजीपाला आणि बेकरी पदार्थांपासून, पूजेचे साहित्य ते थेट हेअर कटिंगपर्यंत प्रत्येक दुकानात कोणीही तुमचं डेबिट कार्ड घेणार नाही, फक्त रोख पैसेच घेतील. कारण, अनेकांकडे ‘कॅशलेस’ व्यवहाराची सुविधाच उपलब्ध नाहीये. तेव्हा आपापल्या खिशात पुरेशी कॅश बाळगणे हेच भलं.

महिनाभरापूर्वी नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतर्फे ‘फर्ग्युसन रस्ता होणार देशातील पहिला कॅशलेस रस्ता’ अशी घोषणा करण्यात आली होती. त्या दृष्टीने पक्षातर्फे विशेष मोहीमही राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा रस्ता खरेच कॅशलेस झाला का, ही पडताळणी ‘सकाळ’ने केली. प्रत्यक्षात मात्र, या घोषणेला महिन्याहून अधिक काळ उलटून गेल्यावरही फर्ग्युसन रस्ता अजूनही पूर्ण कॅशलेस होण्याचे सोडाच, पण अनेक दुकानांपर्यंत ही सुविधाही पोचली नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे ‘नागरिकांच्या सुविधेसाठी कॅशलेस’, असा दावा करण्यासाठी अजून बरेच काम करावे लागणार आहे.

खेळाचे साहित्य, खाद्यपदार्थांच्या दुकानांपासून ते स्टेशनरी, किराणा आणि कपड्यांच्या दुकानांपर्यंत अनेक ठिकाणी कॅशलेस सुविधेची अद्याप प्रतीक्षाच आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणांवर आणि तरुणाईचा वावर असलेल्या अनेक दुकानांवर कार्डस आणि ई- वॉलेटसारख्या सुविधांना चक्क नकार मिळत असल्यामुळे सक्तीने रोख रक्कमच घेऊन फिरावे लागत आहे. भाजपच्या वतीने दोनशेहून अधिक दुकानांत कॅशलेस सुविधा पोचल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अजूनही ही सुविधा न पोचू शकलेल्या कित्येक दुकानांविषयी पक्षाचे सर्वेक्षण काहीही बोलू पाहत नाहीये, हे धडधडीत वास्तव आहे.

ही आहेत ‘ऑन द स्पॉट’ निरीक्षणे

  • पंक्‍चर, सॅंडविच, आइस्क्रीम- कुल्फी, मोजे विक्रेते, शिंपी आदी लहान दुकानांत ‘ओन्ली कॅश’
  • एसी हॉटेल्स, मोठी पुस्तकालय, मेडिकल शॉप्स आदी बड्या दुकानांतच ‘कॅशलेस’
  •  ‘कॅशलेस’ मोहीम अद्याप परिणामकारक ठरली नसल्याचे अनेक दुकानदारांचे मत
  •  दुकानदारांना प्राधान्याने स्वाइप मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी पक्षातर्फे विविध बॅंकांना आणि स्वाइप मशिन कंपन्यांना आवाहन
  • अनेकांना बॅंकांनी दोन ते तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी सांगितला
  • काही प्रसिद्ध हॉटेल्स आणि मोठ्या दुकानांनी तर चक्क ‘कार्ड चालणार नाही’ असे फलकच लावले आहेत

आम्ही राबविलेल्या मोहिमेमुळे फर्ग्युसन रस्त्यावरील २४० दुकानांमध्ये कार्ड स्वाइप मशिन्सची सुविधा सुरू व्हायला मदत झाली. मात्र रस्त्यावरील सुमारे २२ फेरीवाल्या विक्रेत्यांपर्यंत ही सुविधा अद्याप पोचू शकलेली नाही. या विक्रेत्यांची बॅंकेत खाती नाहीत व त्यासाठी पुरेशी कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे त्यांना कार्ड सुविधा पुरविण्यात बॅंकांनी असमर्थता दर्शविली आहे. त्या विक्रेत्यांना आम्ही या संदर्भात मदत करू इच्छितो, पण प्रत्यक्षात अजून ते होऊ शकलेले नाही.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: FC Road waiting for Cashless