इफ्तार पार्टीच्या निमित्ताने दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

दत्ता म्हसकर
रविवार, 10 जून 2018

जुन्नर : जुन्नर पोलिस प्रशासन व कादरीया वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ९) अंजुमन हायस्कूल येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शहराच्या विविध शाळांतून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

नगराध्यक्ष शाम पांडे, युवक नेते अमित बेनके, नगरसेवक हाजरा इनामदार, दीपेश परदेशी, समिर भगत, अविनाश करडीले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत, ॲड. कैलास गोसावी, आरती ढोबळे, अनिल रोकडे, अकिल शेख आदी उपस्थित होते. शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी यावेळी केले.

नगराध्यक्ष पांडे म्हणाले, "भाईचारा , बंधुभाव व एकता कायम ठेवुन एकमेकांचे सण-उत्सव एकत्र साजरे केल्याने शहरात शांतता राहण्यास मदत होईल.  इस्लाम धर्म भाईचारा व बंधु भावाची शिकवण देतो. पैगंबरांचा आदर्श समोर ठेवुन मुस्लिम युवकांनी मार्गक्रमण केल्यास  प्रगतीचा मार्ग सुखकारक होईल" 
अमित बेनके, अलका फुलपगार विचार व्यक्त करून रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामुहिक विशेष दुवापठण करुन मुस्लिम बांधवांनी उपस्थित हिंदु बांधवासमवेत रमजानच्या उपवास सोडला. नगरसेवक फिरोज पठाण यांनी स्वागत केले.   विलास कडलक यांनी सूत्रसंचलन केले. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी आभार मानले. 
 
Web Title: felicitated the students who came first in the class X examination on the occasion of the Iftar party