पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी जुन्नरला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

filing an FIR against five people for assaulting to police at junnar
filing an FIR against five people for assaulting to police at junnar

जुन्नर - आरोपींनीच पोलिसांना शिवीगाळ,दमदाटी व मारहाण केल्याची घटना जुन्नरच्या पोलीस ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकाराची वाच्यता होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असली तरी सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची शहरात रंगतदार चर्चा सुरू आहे. 

या प्रकरणी ठाणे अंमलदार सचिन नंदकुमार देशमुख यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शंकर विजय शिंगाडे,वय 25 रा.वरदरी ता. मालेगाव, जि.वाशीम, राहुल सुभाष दखणे, वय 27, राजेंद्र निवृत्ती शिंदे,वय 28, सचिन सुभाष दखणे, वय 29,व मंगेश किशोर गंगावणे,वय 30, सर्व रा.सिन्नर,ता.सिन्नर, जि.नाशिक, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची समजलेली हकीकत अशी, शिवनेरीवरील वन कर्मचाऱ्याने बुधावरी ता.14 ला सायंकाळी पोलिसांना फोन करुन पायथ्याशी 5-6 जण मद्यपान केलेले तरुण गोंधळ धिंगाणा घालत असून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विनाकारण त्रास देत असल्याचे कळविले. यामुळे देशमुख यांनी तातडीने पोलीस कर्मचारी सूर्यवंशी व चासकर तसेच दोन होमगार्ड येथे रवाना केले त्यांनी ह्या सर्वाना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्याकडे नाव पत्ता चौकशी केली असता एकाने तू कोण मला विचारणारा असे म्हणून ठाणे अंमलदाराची कॉलर पकडली, खुर्चीतून बाजूला ओढून तो धक्काबुक्की व झटापटी करू लागला यावेळी तेथे असलेले पोलीस कर्मचारी सुंर्यवंशी सोडवू लागले असता त्यांच्या पोटात त्याने लाथ मारली. त्यांना शांत बसा असे सांगितले असता ते मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले.यावेळी त्यांच्या सोबत असलेले दोघे आत आले त्यांना हा प्रकार सांगितला. नंतर त्यांनी सर्वांचे नाव व पत्ते दिले. यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com