पाच-सहा दिवसांत शहरात पारा चढणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - विदर्भ, मराठवाड्याला झोडपल्यानंतर अवकाळी पावसाची छाया आता ओसरली असल्याची माहिती हवामान खात्याने शुक्रवारी दिली. राज्यात येत्या मंगळवारपर्यंत (ता. 21) कोरडे वातावरण राहण्याची शक्‍यता आहे; तर पुण्यात 29 अंश सेल्सिअसपर्यंत उतरलेला कमाल तापमानाचा पारा येत्या गुरुवारपर्यंत (ता. 23) 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

कोकणातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली आहे. कर्नाटकच्या उत्तर भागात तयार झालेल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव काही अंशी असल्याने विदर्भातील किमान तापमान अद्यापही सरासरीच्या तुलनेत कमी आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

कर्नाटकच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याच्या स्थितीने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचा भाग सोडला आहे. गेल्या चोवीस तासांत मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Five-six days in the city to climb mercury