'म्हाडा'च्या घरांसाठी 31 हजार अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थेकडून (म्हाडा) पुणे विभागात अडीच हजार घरांच्या काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी 31 हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या घरांसाठी गुरुवारी (ता. 24) काढण्यात येणारी सोडत नगर परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थेकडून (म्हाडा) पुणे विभागात अडीच हजार घरांच्या काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी 31 हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या घरांसाठी गुरुवारी (ता. 24) काढण्यात येणारी सोडत नगर परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

"म्हाडा'चे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. आचारसंहिता संपल्यानंतर पुढील महिन्यात ही सोडत काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "म्हाडा' पुणे विभागाच्या वतीने 2503 सदनिकांच्या वाटपासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी पुणे विभागात या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अडीच हजार घरांसाठी तब्बल 31 हजार 10 जणांनी अर्ज करून त्यासाठी आवश्‍यक अनामत रक्कमही भरली आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या घरांसाठी 24 नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रीडा केंद्र येथे सोडत काढण्यात येणार होती; परंतु नगर परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती ऑनलाइन अर्ज भरलेल्यांना एसएमएसच्या माध्यमातून कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरीतील मोरवाडी, म्हाळुंगे, सासवड, दिवे, सोलापूरमधील शिवाजीनगर, एसपीए-1, सातारा जिल्ह्यातील वाठार निंबाळकर येथील सदनिका आणि भूखंडासाठी ही सोडत काढण्यात येणार आहे.

पुणे

पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळासंदर्भात उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्यांच्या संदर्भातील खुलासा करणारा अहवाल एअरपोर्ट...

03.03 AM

पुणे - ""यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर एकाही मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक चळवळ वाढावी म्हणून प्रयत्न केले नाहीत. केवळ एका...

02.12 AM

पुणे - नुकतेच उद्‌घाटन झालेल्या कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या बार रूममध्ये अनधिकृत "कोनशिला' बसविण्याचा प्रकार घडला आहे....

02.12 AM