माजी आमदार बनसोडे व 3 नगरसेवकांचा 'राष्ट्रवादी'ला रामराम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये "राष्ट्रवादी'ला आणखी एक धक्का

पिंपरी-चिंचवडमध्ये "राष्ट्रवादी'ला आणखी एक धक्का

पिंपरी- "राष्ट्रवादी'चे पिंपरी-चिंचवडमधील माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह तीन नगरसेवकांनी आज (सोमवार) पक्षाला रामराम केला.त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी एक "जोर का झटका'बसला आहे. तिन्ही नगरसेवक हे भाजपचे शहराध्यक्ष आणि "चिंचवड'चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. वरील चौघेही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. दरम्यान, कॉंग्रेसचे नगरसेवक बापू ऊर्फ जालिंदर शिंदे यांनीही आज पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे राजीनामा दिला असून, ते मात्र "राष्ट्रवादी'त जाणार असल्याचे समजले.

बनसोडे यांनी ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्ष सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा "राष्ट्रवादी'ला महाग पडणार आहे. त्यातही "पिंपरी'राखीव या विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे त्यामुळे बदलणार आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी,मात्र बनसोडे यांचा राजीनामा आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले.तर, तो दिला असल्याचे बनसोडे म्हणाले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे शहरात माजी आमदार विलास लांडे हे एकमेव ज्येष्ठ नेते राहिले आहेत. आझम पानसरे यांच्या भाजप प्रवेशानंतर लांडे आणि बनसोडे हेच ज्येष्ठ नेते पक्षात उरले होते. आपल्या समर्थकांना तिकीट वाटपात डावलले गेल्यातून बनसोडे यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांची आता समजूत काढण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून पक्षात सुरू झाले आहेत.

शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे, राजेंद्र जगताप आणि विनय गायकवाड या तीन नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे "चिंचवड'मधील राजकीय समीकरण थोडे बदलणार आहे. जगताप हे आमदार जगताप यांचे बंधू असून काटे हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत.तर, गायकवाड यांच्या पत्नीने अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशाची औपचारिकता फक्त बाकी होती. तीन दिवसांपूर्वीच (ता.27) बाळासाहेब तरस आणि माया बारणे या जगताप समर्थक नगरसेवकांनी राजीनामे देऊन "चिंचवड'मध्ये राष्ट्रवादीला पहिले खिंडार पाडले होते.

भाजपमध्ये नोव्हेंबरमध्ये दाखल झालेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघात आपल्या समर्थकांना आगामी पालिका निवडणुकीत तिकीट देणार आहेत.तर, "चिंचवड'मध्ये शहराध्यक्ष जगताप यांचा तिकिटवाटपात वरचष्मा राहणार आहे. तर, नुकतेच दाखल झालेले पानसरे यांची पिंपरीत ही भूमिका असणार आहे. त्यामुळे आपल्या समर्थकांना पक्ष डावलत असल्याचे लक्षात येताच बनसोडे यांना राजीनामाअस्त्र बाहेर काढावे लागले आहे.

पुणे

पुणे : "ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत 'गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण' असल्याचे म्हणत असतील, अशा देशात...

01.12 PM

पुणे : "अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र...

11.39 AM

पुणे : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ जुनी सांगवीतील अरविंद...

10.48 AM