महालोकन्यायालयात चौदा हजार दावे निकाली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

तडजोडीतून पक्षकारांना न्याय; 26 कोटी 3 लाखांची नुकसानभरपाई
पुणे - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित केलेल्या महालोकन्यायालयात शनिवारी सुमारे 14 हजार 443 प्रकरणे तडजोडीत मिटविण्यात आली. संबंधितांना 26 कोटी 3 लाख 38 हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली.

तडजोडीतून पक्षकारांना न्याय; 26 कोटी 3 लाखांची नुकसानभरपाई
पुणे - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित केलेल्या महालोकन्यायालयात शनिवारी सुमारे 14 हजार 443 प्रकरणे तडजोडीत मिटविण्यात आली. संबंधितांना 26 कोटी 3 लाख 38 हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली.

न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय पातळीवर शनिवारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये मोटार अपघात नुकसानभरपाईच्या दाव्यातील पक्षकारांना न्याय मिळाला. अपघाती मृत्यू झालेल्या "टुरिस्ट व्यावसायिका'च्या उत्पन्नाचा ठोस पुरावा नसल्याने तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण तडजोडीत काढले गेले. त्याच्या कुटुंबीयांना विमा कंपनीने 14 लाख 50 हजार नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. मयत नझीर हुसेन शेख (रा. बिबवेवाडी) यांच्या पत्नी शानू यांनी ऍड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. विमा कंपनीच्या पुढाकाराने सव्वा वर्षात नुकसानभरपाईचा दावा निकाली निघाला. बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या शेषनारायण देविदास खरात यांच्या कुटुंबीयांना 21 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा अपघात जून 2015 मध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे ऍड. कांचन धामणकर यांनी बाजू मांडली. आणखी एका प्रकरणात अपघाती मृत्यू आलेल्या मुलीच्या आई आणि तिच्या बहिणीला विमा कंपनीने दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. पायल रमेशलाल कुकरेजा (वय 21 रा. पिंपरी) असे अपघाती मृत्यू आलेल्या युवतीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2014 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. तिच्या आई आणि बहिणीने नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता.

अपघातात जखमी झालेली आणि परदेशात वास्तव्यास गेलेल्या महिलेला 40 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली. तिने दिलेल्या "पॉवर ऑफ ऍटर्नी'च्या आधारे हा निर्णय घेतला गेला. शिल्पा मोहित गर्ग असे या जखमी महिलेचे नाव असून, एप्रिल 2011 मध्ये त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. त्यांनी ऍड. शशिकांत बागमार, ऍड. निनाद बागमार यांनी न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. खडकी-मुळा रस्त्यावर अपघाती मृत्यू आलेल्या संदेश पांडुरंग अडसरे यांच्या कुटुंबीयांनी ऍड. सुनीता नवले यांनी नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. त्यांच्या कुटुंबीयांना 35 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय लोकन्यायालयात घेण्यात आला.

टॅग्स

पुणे

पिंपरी : महापालिकेचा मिळकतकर आणि पाणीपट्टी हे सध्या ऑनलाइन तसेच करसंकलन कार्यालयात जाऊन भरण्याची व्यवस्था कार्यान्वित आहे. ही...

07.57 PM

पिंपरी : "व्हायचे आहे जयांना या जगी मोठे त्या इमानी माणसांचे सोसणे चालू'' असे गझलकार शोभा तेलंग आपल्या गझलमध्ये व्यक्त...

07.21 PM

नवी सांगवी : येथील इंद्रप्रस्थ चौकातील शंकराचा पुतळा भाविकांचे श्रद्धास्थान होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने...

06.24 PM