एजन्सी देतो म्हणून व्यावसायिकाची एक लाख रुपयांची फसवणूक

प्रशांत चवरे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

भिगवण (पुणे) : औरंगाबाद येथील आर्या अॅग्रो अॅटोमिशन या कंपनीची एजन्सी भिगवण येथे चालविण्यास देतो म्हणुन भिगवण येथील व्यावसायकांची एक लाख रुपयांची फसवणुक केली आहे. या प्रकरणी अतिष नामदेव जगताप (वय.22 रा. भिगवण,ता.इंदापुर) यांनी भिगवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी प्रदीप चव्हाण यांचे विरुध्द भा.दं.वि.का. 420, 504 व 506 सुमार फसवणुकीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रदीप चव्हाण या इसमाने अनिल नामदेव जगताप यांना आौरंगाबाद येथील आर्या अॅग्रो अॅटोमिशन या कंपनीची एजन्सी भिगवण येथे चालविण्यास देतो असे अशी हमी दिली. त्यासाठी त्याचे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेच्या खात्यामध्ये एक लाख रुपये भरण्यास सांगितले. एक लाख रुपये भरल्यानंतर आर्या कंपनीचा ठिबक सिंचनाचे साहित्य पाठवितो असे सांगितले.

वेळोवेळी मोबाईलवर फोन करुनही माल न पाठविल्यामुळे माल तरी पाठवा किंवा पैसे तरी परत द्या असे सांगितल्यावर संबंधितांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. त्यामुळे अनिल नामदेव जगताप यांनी प्रदीप चव्हाण यांचेविरुध्द एक लाख रुपयांची फसवणुक केल्याची व शिवीगाळ करुन दमबाजी केल्याची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांचे मार्गदर्शनाखाली ए.एस. काळे करीत आहेत.

Web Title: fraud and lost of 1 lack rupees