महापालिका शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - महापालिका शाळांतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतला आहे. पुढील टप्प्यात या नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभी केली जाईल, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली.

नवले यांनीच हा प्रस्ताव समितीसमोर मांडला होता. समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. योजनेमुळे महापालिका शाळांतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना लाभ मिळेल. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या पारंपरिक सवयी, समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. सॅनिटरी नॅपकिनचा वापर खूपच कमी असल्याचे विविध सर्वेक्षणांतून निदर्शनास आल्याने हा निर्णय घेतल्याचे नवले यांनी नमूद केले.

या प्रस्तावाला मनीषा लडकत यांनी अनुमोदन दिले होते. बाजारात उपलब्ध सॅनिटरी नॅपकिनची किंमत सर्वसामान्यांना परवडत नाही. विक्रेत्यांकडे सॅनिटरी नॅपकिन मागण्यास संकोच वाटतो, अशा विविध कारणांमुळे मुली त्याचा वापर करू शकत नाहीत, यादृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. या संदर्भात शाळांमध्ये जनजागृती व समुपदेशन केले जाणार आहे.

Web Title: free sanitary napkin in municipal school