काटी-वडापुरी गटासाठी 4 कोटी 10 लाख रुपयांचा निधी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 1 जून 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील काटी-वडापुरी जिल्हा परिषदेच्या गावामध्ये विविध विकासकामांसाठी 4 कोटी 10 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी दिली.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील काटी-वडापुरी जिल्हा परिषदेच्या गावामध्ये विविध विकासकामांसाठी 4 कोटी 10 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी दिली.

काटी- वडापुरी गटामध्ये दलित वस्त्यांमध्ये सिमेंट क्रॉकीटीकरणाचे रस्ते,पाणीपुरवठा योजन,बंदिस्त गटार योजना,समाजमंदिरे व विविध विकासकामे करण्यासाठी 91 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.काटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत होणार असून या इमारतीच्या बांधकामासाठी 2 कोटी 3 लाख निधी मंजूर झाला आहे.या इमारतीचे काम लवकरच सुरु होणा असून आरोग्य केंद्रामुळे काटी परीसातील अनेक नागरिकांना आरोग्याच्या मोफत सुविधांचा लाभ मिळणार आहे. 

 तसेच जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत झगडेवाडी ,तरंगवाडी ,सराफवाडी ,सरडेवाडी येथील स्मशानभूमी शेड सुधारणा कामासाठी 22 लाख 10 हजार रुपये, कांदलगाव स्मशानभूमी सुधारणेसाठी 1 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जाधववाडी, सराफवाडी, सरडेवाडी या गावांना ग्रामपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 36 लाख निधी मंजूर झाला आहे. 

महिला बालकल्याण विभागामार्फत रेडणी अंतर्गत काळेवस्ती अंगणवाडीस 6 लाख रुपये मंजूर झाले अाहेत.   जिल्हा परिषद निधीतून वीस टक्के निधीच्या हेडमधून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये रस्ते बांधकामासाठी 11 लाख रुपये मंजूर झाले असून  या निधीमध्ये तरंगवाडी ,रेडणी गावांचा समावेश आहे. बाभूळगाव येथील गुरगुडेवस्ती हनुमान मंदिर सभामंडप,अभंगवाडी येथील पुलबांधकाम ,झगडेवाडी येथील सभामंडपाच्या बांधकामासाठी 22 लाख झेडपी मधून मंजूर आहेत.

पंधारवाडी ,गोखळी  भागात हायमास्ट दिवे बसविण्यासाठी 3 लाख 26 हजार रुपये देण्यात आले आहेत. समाजकल्याण विभागामार्फत हिंगणगाव येथे 1 लाख 63 हजार निधी मंंजूर झाला. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग यांच्या मार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांतून शेतकऱ्यांना विविध शेती अवजारे ,शेळ्या मेंढ्या ,कुक्कुटपालन योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच युवकांसाठी व्यायामशाळा साहित्य, समाजप्रबोधन साहित्य, वृद्ध कलाकारांना मानधन यशवंत घरकुल ,रमाई आवास योजनांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. 

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तामामा भरणे, बारामती  अॅग्रोचे रोहित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, यांच्या मार्गदर्शनाखाली  काटी- वडापुरी गटातील 22 गावांमध्ये विविध विकास कामे  मार्गी लावण्यात येणार असल्याचे तांबिले यांनी सांगितले.

Web Title: fund of 4 crore 10 lakhs rupees for kati wadapuri pune