गणेशोत्सवात आजपासून वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे - शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंगळवार (ता. 29) पासून गणपती विसर्जनापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत राहील. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा बदल करण्यात आला आहे.

पुणे - शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंगळवार (ता. 29) पासून गणपती विसर्जनापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत राहील. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा बदल करण्यात आला आहे.

* शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक- जंगली महाराज रस्ता- अलका चौक- टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. सिमला चौक- कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक- बोल्हाई चौकमार्गे नेहरू रस्त्याचा वापर करूनही स्वारगेटकडे जाता येईल. गर्दीच्या वेळेत परिस्थितीनुसार पीएमपीएमएल बसेस वळविण्यात येतील.
* चारचाकी वाहनचालकांना गाडगीळ पुतळा- शाहीर अमर शेख चौक- तेथून पुढे नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल. तसेच, जिजामाता चौक ते फुटका बुरूज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्यापासून नदीपात्रातील रस्त्याने भिडे पूल जंक्‍शनवरून अलका चौकमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
* नेहरू रस्त्याने लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्यावरून हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने जावे.
* अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजमार्गे गाडगीळ पुतळा चौक, तेथून उजवीकडे वळून जिजामाता चौक, डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौक- उजवीकडे वळून गोटीराम भैया चौक- डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जावे.

नो पार्किंगबाबत-
शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते बेलबाग चौक- रामेश्‍वर चौक- उजवीकडे वळून मंडई ते शनिवार चौक- उजवीकडे सेवासदन चौक- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर सर्व वाहनांना पार्किंगसाठी मनाई राहील. तसेच, गरज भासल्यास या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशास बंदी राहील.

पार्किंग व्यवस्था -
शिवाजी रस्त्यावर गाडगीळ पुतळा ते राष्ट्रभूषण चौक- शिवाजी रस्ता,
खडकमाळ आळी रस्त्यावर राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक, तसेच बाजीराव रस्त्यावर पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक या मार्गांवर वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात येत आहे.
या कालावधीत वाहने पार्किंगची सुविधा असलेली ठिकाणे :
- विमलाबाई गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता
- एच. व्ही. देसाई महाविद्यालय ते मनपा विद्यालय विश्रामबाग
- पुलाची वाडी नदीकिनारी
- पूरम चौक ते हॉटेल विश्‍व रस्त्याच्या डाव्या बाजूस
- गणेश रस्त्यावर दारूवाला पूल ते खडीचे मैदान
- गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक
- कॉंग्रेस भवन- मनपा रस्ता
- सर्कस मैदान
- व्होल्गा चौक ते मित्रमंडळ कॅनॉलच्या कडेला बाजी पासलकर पथ
- टिळक पूल ते भिडे पूल- नदीकिनारी
- बालभवनसमोर सारसबाग रस्त्यावर बजाज पुतळा ते सणस पुतळा चौकापर्यंत उजवी बाजू
- नारायण पेठेत हमालवाडा पार्किंग

गणेश विसर्जन ठिकाणांजवळ वाहन पार्किंग व्यवस्था
*अप्सरा टॉकीजजवळ कॅनॉल (पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता)-
नेहरू रस्त्यावर वाहने अप्सरा टॉकीज ते प्रिन्स हॉटेलदरम्यान अप्सरा टॉकीजच्या बाजूस वाहने पार्क करावीत.
* चिमाजी अप्पा पेशवे रस्त्यावरील सावरकर पुतळ्याजवळ कॅनॉल (मित्रमंडळ- सावरकर चौकादरम्यान)
चिमाजी अप्पा पेशवे पथावर कॅनॉलच्या पुढे मित्रमंडळ चौकापर्यंत पाटील प्लाझाच्या डाव्या बाजूला तसेच सावरकर पुतळा चौकापासून ते पेशवे पार्क या सिंहगड रस्त्यावर सारसबागेच्या बाजूस वाहने पार्क करावीत.
* संगम पूल घाट (आरटीओ कार्यालयाजवळ)
संगम पूल येथील सीआयडी कार्यालय ते आरटीओ चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस भिंतीला लागून वाहने पार्क करावीत. तसेच, एसएसपीएमएस मैदानाच्या बाजूसही वाहने पार्क करता येतील.
* एस. एम. जोशी पुलाखाली (गरवारे महाविद्यालयाच्या मागे)
गरवारे महाविद्यालयाच्या मागे तसेच ठोसर पागेसमोर वैकुंठ स्मशानभूमी रस्ता.
* बाबा भिडे पूल
पुलाच्या दोन्ही बाजूस नदी पात्रातील मोकळी जागा
* विसर्जनसाठी सोबत आणलेली वाहने श्रींची मूर्ती वाहनावरून उतरवल्यानंतर तेथून वाहन तत्काळ अन्यत्र हलवावे. जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही.
 

शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी (ता. 5) सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निघेल. त्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी मिरवणूक संपेपर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर, काही ठिकाणी दुपारी बारा वाजल्यापासून रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीसाठी बंद रस्ते-
शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्‍शन ते जेधे चौक (सकाळी सात ते मिरवणूक संपेपर्यंत)
लक्ष्मी रस्ता - सोन्या मारुती चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी सात ते मिरवणूक संपेपर्यंत)
बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी नऊ ते मिरवणूक संपेपर्यंत)
बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक (दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)
कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक (दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)
गणेश रस्ता - दारूवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)
केळकर रस्ता - बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)
गुरुनानक रस्ता - देवजीबाबा चौक - हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी नऊ ते मिरवणूक संपेपर्यंत)
टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक (सकाळी 9 ते मिरवणूक संपेपर्यंत)
शास्त्री रस्ता - सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक (दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)

(मंगळवारी सायंकाळी 4 ते मिरवणूक संपेपर्यंत)
जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडुजीबाबा चौक
कर्वे रस्ता - नळस्टॉप ते खंडुजीबाबा चौक
फर्ग्युसन रस्ता - खंडुजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार
भांडारकर रस्ता - पीवायसी जिमखाना चौक ते गुडलक चौक ते नटराज चौक
पुणे - सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक
सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
प्रभात रस्ता - डेक्‍कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. वाहनचालकांनी या तात्पुरत्या रिंगरोडचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
रिंगरोड-
कर्वे रस्ता ः नळस्टॉप चौक - लॉ कॉलेज रस्ता - सेनापती बापट रस्ता जंक्‍शन : गणेशखिंड रस्ता - सिमला ऑफिस चौक - संचेती हॉस्पिटल चौक - इंजिनिअरिंग कॉलेज - आंबेडकर रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक - मालधक्‍का चौक - बोल्हाई चौक - नरपतगिरी चौक - नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी - सेव्हन लव्हज चौक - वखार महामंडळ चौक - शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केट यार्ड, सातारा रस्त्याने व्होल्गा चौक - सिंहगड
रस्त्याने मित्रमंडळ चौक - सावरकर चौक - सिंहगड रस्ता जंक्‍शन - लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलिस चौकी - म्हात्रे पूल ते नळस्टॉप.

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी, तसेच वाहतूक सुरळीत राहावी, या उद्देशाने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा वापर करून नागरिकांनी शहर पोलिसांना सहकार्य करावे.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त (वाहतूक)