पुणे - साबळेवाडीच्या सरपंचपदासाठी गणेश शिंदे

shinde
shinde

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील साबळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट जनतेतून सरपंच होण्याचा मान गणेश चंद्रकांत शिंदे यांनी पटकावला त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गौतम बाबुराव शिंदे यांचा 558 मतांनी पराभव केला.  

यंदा साबळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसुचित जातीसाठी साठी राखीव आहे. यासाठी दुरंगी लढत झाली. यामध्ये गणेश चंद्रकांत शिंदे यांना 898 व गौतम बाबुराव शिंदे 340 मते मिळाली यामध्ये गणेश शिंदे हे 558 मतांनी विजयी झाले. व थेट जनतेतुन सरपंच पदाचा पहिला मान मिळविला.

सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक एक अनुसुचित जाती स्त्रीच्या जागेसाठी दिपाली विलास शिंदे 314 व निर्मला अरुण शिंदे यांना 129 मते मिळाली यामध्ये दिपाली शिंदे या 185 मतांनी विजयी झाल्या.नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेसाठी कांताबाई शिवाजी गाढवे 141 व सचिन मोहन थोरात यांना 302 मते मिळाली यामध्ये सचिन थोरात 161 मतांनी विजयी झाले. तर सर्वसाधारण जागेसाठी दत्तु सिताराम गुळुमकर 136 व गणेश दत्तात्रय साबळे 308 मते मिळाली यामध्ये गणेश साबळे हे 172 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण जागेसाठी परशुराम किसन भगत 217 व जालिंदर पांडुरंग शिळमकर 248 यांना मते मिळाली यामध्ये जालिंदर शिळीमकर 31 मतांनी विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री जागेसाठी शकुंतला नानासो गाडेकर 244 व सारिका दिलीप गाढवे 233 मते मिळाली यामध्ये शकुंतला गाडेकर 11 मतांनी विजयी झाल्या. सर्वसाधारण स्त्री जागेसाठी अर्चना विनायक भगत 239 मते  व कुसुम दिलिप भापकर 214 मते मिळाली.यामध्ये अर्चना भगत 25 मतांनी विजयी झाल्या.

प्रभाग तीन मधिल तीनही जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये सर्वसाधारण गटातुन पोपट वामन पानसरे, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री गटातुन सुमन बाळु गाढवे व सर्वसाधारण स्त्री गटातुन मिना विजय गोलांडे यांची निवड झाली. 

दिर भावजय झाले विजयी...
साबळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी गणेश शिंदे हे विजयी झाले तर प्रभाग 1 मध्ये त्याची भावजय दिपाली विलास शिंदे  या विजयी झाल्या .यामुळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिर भावजय एकाच वेळी ग्रामपंचायतीच्या कारभारात सहभागी झाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com