थायलंडमधून आणलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

सुखसागर ते साईनगर विहारपर्यंत मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. तीन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांसह भीम बुद्ध गीते सादर करण्यात आली. सोनाबाई कांबळे व द्रौपदाबाई चौगुले यांच्या समरणार्थ त्रिरत्न फाउंडेशनचे सचिव सागर कांबळे यांनी अन्नदान केले.

कोंढवा : थायलंडमधून आणलेल्या गौतम बुद्धांच्या अडीचशे किलो वजनाच्या मूर्तीची कोंढवा बुद्रुक येथील साईनगरमध्ये नव्याने बांधलेल्या सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या सभागृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. 

नेत्रदीपक अशी ही मूर्ती पाच फूट उंचीची आहे. रेंजीहील रहिवाशी सभेच्या प्रयत्नातून ती येथे आणण्यात आली आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यास आमदार योगेश टिळेकर, नगसेवक विरसेन जगताप, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, संगीता ठोसर, अमित जगताप, नीलेश धांडेकर, संदीप बधे आदी उपस्थित होते. 

सुखसागर ते साईनगर विहारपर्यंत मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. तीन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांसह भीम बुद्ध गीते सादर करण्यात आली. सोनाबाई कांबळे व द्रौपदाबाई चौगुले यांच्या समरणार्थ त्रिरत्न फाउंडेशनचे सचिव सागर कांबळे यांनी अन्नदान केले. रागोळी, चित्रकला, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. विहाराच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांचा विहाराच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. भंतेजींच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भागवत पालखे, अप्पा तळेकर, अरुण शिंदे, महादेव झेंडे, शिवाजी झेंडे यांनी परिश्रम घेतले.