वचननाम्याचा सातत्याने आढावा घेणार - बापट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - ""पुणेकरांनी भाजपवर भरभरून विश्‍वास दाखविला असून, त्याची जबाबदारी पक्षावर आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक जबाबदारीने शहराचा विकास करतील,'' असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. पुणेकरांसाठी तयार केलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी व्यवस्थीत होण्यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाल्यावर बापट यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी ते बोलते होते. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते. विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाही वेळ काढून बापट आज पुण्यात आले होते. ते म्हणाले, ""नगरसेवक प्रभागातील प्रश्‍न सोडवत असतानाच पक्ष संघटनेचेही त्यावर लक्ष असेल. वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोगावले यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा असेल. नियमितपणे त्याचा आढावा घेतला जाईल. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन शहराचा विकास करण्याची पक्षाची भूमिका आहे.'' 

विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे, मेट्रोला गती देणे, जायका प्रकल्पाचे काम सुरू करणे, रिंगरोड मार्गी लावणे आदींना पक्ष प्राधान्य देणार आहे. भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीचे सर्व नगरसेवक नागरिकांसाठी उपलब्ध राहतील. सभागृहातील उपस्थितीसाठी पक्षाने आचारसंहिता तयार केली आहे. तिची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने होईल. भाजपचे कार्यकर्तेही विकासकामांसाठी आग्रही असतील, असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

Web Title: girish bapat in pune