'त्या' मुलीचा मृतदेह आढळला जवळच्या विहिरीत

युनूस तांबोळी
शुक्रवार, 25 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): झाडाखाली खेळत असणारी तीन वर्षाची मुलगी बिबट्याने उचलून नेल्याची भीती कुटूंबाने व्यक्त केली. त्यामुळे शिरूर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी परीसरात तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या तपासात अखेर या मुलीचा मृतदेह जवळच असणाऱ्या विहिरीत आढळला.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): झाडाखाली खेळत असणारी तीन वर्षाची मुलगी बिबट्याने उचलून नेल्याची भीती कुटूंबाने व्यक्त केली. त्यामुळे शिरूर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी परीसरात तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या तपासात अखेर या मुलीचा मृतदेह जवळच असणाऱ्या विहिरीत आढळला.

जांबूत (ता. शिरूर) येथील सरदवाडीत गुरूवारी (ता. 24) संगीता प्रवीण वाजे या घराशेजारील जांभळाच्या झाडाखाली मुलगी ईश्वरी (वय 3) हिला घेऊन शेतात काम करत होत्या. घरात धोंड्याचा कार्यक्रम असल्याने घरातील मंडळीची लगबग होती. त्यावेळी ईश्वरी कोणाला सापडेना तिच्याजवळ असणारा तांब्या व खेळणी अस्थाव्यस्त झाली होती. परीसरातील ग्रामस्थांच्या मदतीने परीसर पिंजून काढण्यात आला. ठावठिकाणा लागला नाही, त्यावेळी शिरूर वनविभागाला या बाबत माहिती देण्यात आली. शिरूरचे वनपरीमंडल अधिकारी एस. एल. गायकवाड व वनपाल पी. ए. क्षीरसागर यांनी वनकर्मचारी सहीत घटनास्थळी धाव घेतली. रात्री अकरा पर्यंत हा परीसर पिंजून काढण्यात आला. मात्र, बिबट्याचा कोणताच सुगावा येथे लागला नाही. ईश्वरी देखील सापडली नाही.

दरम्यान, आज (शुक्रवार) पुढील तापस करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून वनविभागाने पु्न्हा या परीसरातील जवळपास 15 ते 20 एकर उसाचे क्षेत्र तपासले. ईश्वरी खेळत असलेल्या झाडापासून शंभर ते सव्वाशे फुट अंतरावर असणाऱ्या विहीरीची तपासणी करण्यात आली. अखेर या विहिरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या बाबत कुटूंबाची कोणतीच तक्रार नसल्याचे समजते. दरम्यान वनरक्षक क्षीरसागर म्हणाले की, संबधीत मुलीला बिबट्याने नेले नसून ती खेळता-खेळता विहीरीत पडली. तिचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला.

बिबट्याची दहशत...
या परीसरात आडोसा, पाणी व भक्षकाची सोय असल्याने बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. वरील घटनेचा प्रकार अपघाती असला तरी देखील परीसरातील बिबट्यांची संख्या पाहता नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतात असणाऱ्या विहिरींना कठडे बांधून घेणे आवश्यक आहे. शिवाय, लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: Girls body found in nearby well