सरकारी योजनांचा बारामती तालुक्यातील 494 शेतकऱ्यांना लाभ

money
money

शिर्सुफळ - पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत 75 टक्के अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभ योजनांचे थेट लाभ हस्तांतर योजनेच्या माध्यमातुन बारामती तालुक्यातील 494 लाभार्थ्यांना एकूण 52 लाख 53 हजार 270 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व उपसभापती शारदा खराडे यांनी दिली.

सन 2017-18 जिल्हा परिषद निधी योजनेंर्तगत कृषी विभागाच्या 75 टक्के अनुदानावर कृषी अवजारांची थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना राबविण्यात येते आहे. यामध्ये बारामती तालुक्याच्या पंचायत समिती कृषी विभागाच्या माध्यमातुन 42 लाभार्थ्यांना तीन एचपी ओपन वेल मोटार पंपसंच प्रतिनग 12 हजार 990 अनुदान प्रमाणे 5 लाख 54 हजार 580 रुपये, 42 लाभार्थ्यांना पाच एचपी मोटार पंपसंच प्रतिनग 15 हजार 750 प्रमाणे 5 लाख 61 हजार 500 रुपये, 17 लाभार्थ्यांना 7.5 एचपी मोटार पंपसंचासाठीच्या प्रतिनग 20 हदार 870 रुपये प्रमाणे 3 लाख 54 हजार 790 रुपये अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. या शिवाय अडीच इंची पीव्हीसी पाईप 59 लाभार्थ्यांना 1180 नग प्रतिनग 285 प्रमाणे 3 लाख 36 हजार 300, तीन इंची पीव्हीसी पाईप 99 लाभार्थींना 1980 नग प्रतिनग 390 प्रमाणे 7 लाख 72 हजार 200 रुपये, 3 एचपी पेट्रोडिझेल पंपसंच खरेदी करणाऱ्या 2 शेतकऱ्यांना प्रतिनग 14 हजार 980 प्रमाणे 29 हजार 960 व  3 एचपी पेट्रोकेरोसिन पंपसंच घेणाऱ्या एकमेव लाभार्थ्यांना 18 हजार 420 रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. 

याबरोबरच बॅटरी स्प्रेपंप घेणाऱ्या 26 लाभार्थींना प्रतिनग 3 हजार 70 प्रमाणे 79 हजार 830, एचटीपी स्प्रेपंपच्या 4 लाभार्थ्यांना प्रतिनग 16 हजार प्रमाणे 64 हजार रुपये, प्लास्टिक क्रेट 12 लाभार्थी शेतकऱ्यांना 144 नग प्रतिनग 170 प्रमाणे 24 हजार 480 रुपये, प्लास्टिक ताडपत्रीसाठी 61 लाभार्थी प्रतिनग 2 हजार 325 प्रमाणे 1 लाख 41 हजार 825, ट्रक्टरचलित दोन फाळी सरी रिझरसाठी 15 शेतकऱ्यांना प्रतिनग 15 हजार 65 प्रमाणे  2 लाख 25 हजार 975 रुपये व 2 एपी इलेक्ट्रीक कडबा कुट्टीसाठी 114 शेतकऱ्यांना प्रतिनग 17 हजार 530 प्रमाणे 19 लाख 98 हजार 420 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत.

याबाबत बारामती पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय जगताप, विशेष घटकचे रमेश बोरावके, कृषी विस्तार अधिकारी एन.डी.गायकवाड. सी.बी.गायकवाड यांनी लाभार्थी अनुदान प्रक्रिया पार पाडली.  

रक्कम थेट खात्यावर..
कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले होते. सदर अर्जांची छाननी करुन अर्ज जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले. त्यानुरुप मंजुर यादी प्रसिध्द झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी संपर्क साधुन शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या नियमानुरुप कार्यवाही करीत प्रस्ताव पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकच वेळी रक्कम खात्यावर वर्ग करण्यात आली. यामध्ये फक्त 6 शेतकऱ्यांच्या बँक खात्याची अडचण होती.याबाबत जिल्हा परिषदेकडे पुर्नमाहिती पाठविण्यात आली.   
- प्रमोद काळे  (गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com