जिल्ह्यात राजकीय रणधुमाळीला सुरवात

Voting-Machine
Voting-Machine

शिर्सुफळ - राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या; तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुरूप सोमवारी (ता.२३) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. रविवारी (ता. २७ मे) मतदान प्रक्रिया होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या पूर्ण; तर २५८ ग्रामपंचायतींच्या ४५६ जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. यामुळे गावपातळीवर राजकीय रणधुमाळीला सुरवात झाली आहे.

निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुरूप थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. यामध्ये सर्वाधिका बारामती तालुक्‍यातील १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुरंदरमधील नव्याने स्थापन झालेल्या वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी यांसह इतर १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे
वेल्हा-१ - साईव बु., मावळ- ७ : ओवळे, दिवड, कल्हाट, सुद्रुंब्रे, सुदवडी, कोंडीवडे अ.मा., जांबवडे, भोर- ६ : रायरी, अशिंपी, करंजे, नाटंबी, शिळींब, वारवंड, जुन्नर- ३ : बेल्हा, गुंजाऴवाडी, तांबेवाडी, मुळशी- १ : मुळशी खर्द, पुरंदर- १३ : एखतपूर-मंजवडी, राजुरी, माळशिरस, वनपुरी, उदाचीवाडी, वीर, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, खेड- १३ : सुपे, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, वाहागाव, मोरोशी, डेहणे, आडगाव, वाळूद, वाघू, एकलहरे, तिफनवाडी, धुवोली, आंबेगाव- १० : पारगाव त.अवसरी बु., टाव्हरेवाडी, कानसे, चपटेवाडी, सुपेधर, अवसरी बु., फुलवडे, डिंभे बु., तांबडेमळा, लोणी, बारामती- १५ : वंजारवाडी, कोऱ्हाळे खुर्द, करंजे, सुपे, शिर्सुफळ, चांदगुडे वाडी, भोंडवेवाडी, साबळेवाडी, मगरवाडी, काळखैरेवाडी, जराडवाडी, उंडवडी क.प.,दंडवाडी, पानसरेवाडी, कुतवळवाडी, शिरुर- ६ : आण्णापूर, शिरूर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी, तार्डोबाचीवाडी, वाजेवाडी, इंदापूर- ५ : लाकडी, बावडा, वकील वस्ती, काझड, शिंदेवाडी, दौंड- १० : कुरकुंभ, वाटलूज, नायगाव, वडगाव बांडे, पानवली, केडगाव, वाखारी, पारगाव, खोपोडी, पांढरेवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com