मोटारीच्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू

पुणे/वडगाव शेरी - गणरायाला निरोप देतानाचा सोहळा पाहण्यासाठी आजी आणि नातू घरातून बाहेर पडले. इतरांसमवेत ते विसर्जन मिरवणूक पाहण्यात दंग होते. तेवढ्यात एका भरधाव मोटारीने उडविल्याने आजी-नातवाचा मृत्यू झाला.  

खराडीत बुधवारी (ता.१९) रात्री ही घटना घडली. आजी कांताबाई साहेबराव सोनुने (वय ६१, आंबेडकर नगर, माहूरा, ता. जाफ्राबाद, जालना) आणि त्यांचा नातू नयन रमेश मोकळे (वय ११, सातववस्ती, खराडी) यांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात महेंद्र लोखंडे (वय ४१, सातववस्ती, खराडी) हे जखमी झाले. गणेशोत्सवाचा सातवा दिवस असल्याने काल सकाळपासून विसर्जनाची लगबग सगळीकडे सुरू होती. कांताबाई नयनसमवेत 

विसर्जन मिरवणूक पाहत होत्या. त्याच वेळी होंडा सिटी मोटार रॅडीसन हॉटेलकडून सातव वस्तीच्या दिशेने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारीची धडक कांताबाई, नयन यांना बसली. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाचा शोध न घेतल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी वाहनचालकास शिरूर येथून अटक केली. 

नयनचे वडील भारतीय लष्करात आहेत. मागील महिन्यात नयनच्या छोट्या भावाचा अपघात झाल्याने ते पुण्यात सुटीवर आले होते. त्यालाच पाहण्यासाठी कांताबाईही गावाहून आल्या होत्या. दरम्यान, त्या नयनला घेऊन मिरवणूक पाहण्यासाठी गेल्या असताना हा अपघात होऊन त्यामध्ये आजी-नातवाचा मृत्यू झाला. नयन हा चंदननगर येथील केंद्रीय विद्यालयात शिकत होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com