तरुणाईत हॅशटॅगची "क्रेझ' 

तरुणाईत हॅशटॅगची "क्रेझ' 

पुणे - प्रियाने तिला आवडलेल्या ब्रॅंडेड टी-शर्टचा फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर "#बॅण्ड #शॉपिंग #फिलिंग हॅप्पी' असे विविध "हॅगटॅग' वापरून शेअर केला अन्‌ त्यावर काही मिनिटांत "लाइक्‍स'चा पाऊस पडला... पण, तिने पोस्टमध्ये वापरलेल्या "हॅशटॅग'लाही तिच्या मित्रांची पसंती मिळाली. सोशल मीडियावर "हॅशटॅग'चा फंडा तसा नवा नाही; पण आता कंपन्यांकडूनही "हॅगटॅग'चा ब्रॅंड प्रमोशनसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यासाठी आगळे-वेगळे "हॅशटॅग' वापरले जात असून, ते तरुणाईला आकर्षित करत आहेत. या "हॅशटॅग'चा उपयोग कंपन्यांच्या ब्रॅंडच्या प्रसिद्धीसाठी होत आहे. 

आपल्या ब्रॅंडच्या ऑनलाइन प्रसिद्धीसाठी अनेक नवे फंडे आजमावले जातात. त्यात सध्या कंपन्यांकडून "हॅशटॅग'चा वापर केला जात आहे. #गुडब्रॅंड #ॅयुवर फेव्हरेट ब्रॅंड #ं ब्रॅंडेड कलर्स असे विविध प्रकारचे "हॅशटॅग' कंपन्यांच्या पसंतीनुसार विकसित केले जात असून, ते कंपन्यांचे पेज आणि संकेतस्थळावर पाहायला मिळत आहेत. आपल्या ब्रॅंडची माहिती नेटिझन्सपर्यंत पोचावी आणि त्यांनी "हॅशटॅग'द्वारे ब्रॅंड सर्च केल्यावर त्यांना प्रोफाइल सापडावी, या उद्देशाने "हॅशटॅग'चा फंडा वापरण्यात येत आहे. हा नवा फंडा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसह व्हॉट्‌सऍपवरही वापरला जात असल्याचे पाहता येईल. हॅशटॅगची क्रेझ तरुणांमध्ये होतीच; पण ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून त्याचा पुरेपूर वापर होत आहे. तरुण-तरुणीही आपल्या ब्रॅंडचे "हॅशटॅग'मधून प्रमोशन करत आहेत. 

नावाचेही "हॅशटॅग' 
तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर "हॅशटॅग' वापरून स्वतःचे नाव सर्च केले तरी आपली प्रोफाइल डोळ्यांसमोर येईल. त्यासोबत "हॅशटॅग' वापरून फेसबुक पेज सर्च केलात तरी तोही आपल्याला सापडेल. त्यामुळे "हॅशटॅग' हा सोशल मीडियावर एक ट्रेंड बनला आहे. 

"इन्स्टाग्राम'वर फेमस 
इन्स्टाग्रामवर स्वतःचे नाव असो वा पेज... आपल्याला ते सहज सापडेल. सध्या "हॅशटॅग'चा सर्वाधिक वापर "इन्स्टाग्राम'वर होत आहे. #इन्स्टाक्‍लिक #इन्स्टाफोटोग्राफी असे विविध "हॅशटॅग' "इन्स्टाग्राम'वर वापरले जात असल्याचे दिसेल. खासकरून एखादा फोटो शेअर केल्यानंतर किंवा एखाद्या इन्स्टा पेजला टॅग करण्यासाठी या "हॅशटॅग'चा वापर केला जात आहे. 

तरुणाईकडून सर्वाधिक वापर 
"हॅशटॅग'ची क्रेझ सर्वाधिक आहे ती तरुणाईत. आयुष्यातील प्रत्येक क्षणी हा "हॅशटॅग' फंडा वापरून आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर केला जात आहे. या "हॅशटॅग'मुळे तरुणांना आपले म्हणणे सहजरीत्या मांडता येत आहे. 

"हॅशटॅग'मधून भावनाही शेअर 
"फिलिंग हॅप्पी' असो वा "फिलिंग सॅड', "फिलिंग एन्जॉय' असो वा "फिलिंग सरप्राईज्ड' तरुणाईच्या मनातील भावनाही "हॅशटॅग'मधून व्यक्त केल्या जात आहेत. या "हॅशटॅग'चा वापर गेल्या तीन ते चार वर्षांत मोठ्या प्रमाणात होत आहे. 

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट शेअर करायची असेल तर मी "हॅशटॅग' नक्कीच वापरतो. यातून पोस्ट आकर्षक बनतेच; पण "हॅशटॅग' वापरल्याचा फायदाही आपल्याला होतो. कंपन्यांकडून ब्रॅंडिंगसाठी त्याचा वापर होत आहे ही चांगली गोष्ट असून, सध्या त्याचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. 
- मयांक शहा, नोकरदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com