थंडीची तीव्रता वाढण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - राज्यात थंडी वाढत असून, पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने थंडीची तीव्रता वाढण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. राज्यात नगर येथे सर्वांत कमी म्हणजे 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातील किमान तापमान 12.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत थंडी पडली असली तरी बहुतांश भागातील तापमान सरासरीइतके होते. पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता असल्याने थंडी काही अंशी वाढेल, असे हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उत्तर भारतात थंडी पडत आहे. तेथून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात जाणवत असून, तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान सरासरीपेक्षा 0.4 अंश सेल्सिअसने जास्त म्हणजे 31.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 3.7 अंशाने कमी होऊन 12.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला. 

Web Title: increase the intensity of Cold