प्राणिमित्रांमुळे जखमी मोराची सुटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पुणे - प्राणिमात्रांच्या सतर्कतेमुळे जखमी अवस्थेतील मोराची चौघांकडून सुटका झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्राणिमित्रांनी या मोराला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील अनाथालयात दाखल केले आहे.

चांदणी चौकाजवळील खिंडीच्या ठिकाणी चार अज्ञात व्यक्ती जखमी मोर घेऊन जात असल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळले. त्यांना जयसिंग मोकाशी व विनायक गायकवाड यांनी हटकल्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला. त्यानंतर मोकाशी व गायकवाड यांनी प्राणिमित्र दीपक पाचारणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाचारणे, प्रवीण उभे व कालिदास पवार यांनी मोराला ताब्यात घेतले. त्या वेळी सर्व पंख काढल्यामुळे मोर जखमी झाल्याचे दिसून आले. 

याबाबतची वनविभागाचे अधिकारी भावसार यांना माहिती देण्यात आली. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मोराला उपचारासाठी प्राणिसंग्रहालयामध्ये पाठविण्यात आले.