महिन्याभरात 'इसिस' संपणार : संदीप वासलेकर

'ISIS' to end in a month: Sandeep Vaslekar
'ISIS' to end in a month: Sandeep Vaslekar

पुणे - 'अलीकडेच पाणी या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जेव्हा चर्चा झाली, तेव्हा तेथे मलाही बोलावण्यात आले होते. त्यावेळी 'दहशतवादी संघटना पाण्याचे स्त्रोत हस्तगत करतात आणि जगभरात नागरिकांना ओलीस धरतात. त्यामुळे दहशतवाद्यांचा धरणांवर कब्जा होऊ नये, यासाठी देशांनी प्रयत्न करायला हवा' असा उपाय मी सुचवला होता. त्याच्याच पुढच्या काही दिवसांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियात इसिस या संघटनेने जे धरण काबीज केले होते, ते हल्ले करून मुक्त केले. इसिसने शरणागतीही पत्करली. येत्या महिना दीड महिन्यात इसिस ही दहशतवादी संघटना पूर्णतः संपुष्टात येेईल!- सांगत होते आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व लेखक संदीप वासलेकर...

भारतीय विचार साधना प्रकाशन आणि विश्व संवाद केंद्र यांनी आयोजिलेल्या विचार भारती साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून रविवारी वासलेकर आपली भूमिका मांडत होते. या वेळी आचार्य गोविंददेव गिरी, स्वागताध्यक्ष प्रदीप रावत, डॉ. मुकुंद दातार आदी उपस्थित होते.

संश्लेषण या संकल्पनेबद्दल वासलेकर बोलत होते. विश्लेषण (ऍनालिसिस) हा पाश्चिमात्य ज्ञानाचा मार्ग आहे तर, संश्लेषण (सिंथेसिस) हा आपल्याकडील अर्थात पौर्वात्य ज्ञानाचा मार्ग आहे. ही आपल्या भारतीयांना मिळालेली फार मोठी देणगी आहे. आज मी जागतिक परिस्थिती बाबत जे अभ्यासू अंदाज वर्तवू शकतो, ते या संश्लेषणाच्या बळावरच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या उपजत ज्ञानाचा आजच्या काळात व्यवहारात कसा उपयोग करून घ्यावा, याचा विचारच आपण करत नाही. हे चित्र बदलावे. 'कालचा भारत, आजचा भारत आणि उद्याचा भारत' यांची आज सांगड घालण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संशोधनात प्रगती कधी ?
वासलेकर म्हणाले, "आपण भारतीय संशोधनात खूप कमी पडतो. संशोधनाची गरज सर्वच क्षेत्रांत आहे. भारताचे सामरिक सामर्थ्य जराही कमी नाही. मात्र, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सामर्थ्य आपण कधी विकसित करणार आहोत ? संशोधन आणि नवनिर्मितीचा ध्यास हीच उद्याच्या भारताची खरी शक्ती असणार आहे. तक्षशिला विद्यापीठ असताना जे मूलभूत संशोधन आपल्याकडे झाले, तेच दिवस पुन्हा यायला हवेत."

साहित्याचा पुनर्विचार व्हावा
साहित्याविषयी व्यापक दृष्टिकोन मांडताना गोविंददेव गिरी म्हणाले, "जे खपतं ते सगळं खरंच साहित्यच असतं का, याचा विचार आज करण्याची गरज आहे. आज साहित्याची जिकडेतिकडे गर्दी झाली आहे. मात्र त्याचा दर्जा हरवत चालला आहे. ललित साहित्याची आचार्य अत्रे यांनी केलेली व्याख्या महत्त्वाची आहे. ते म्हणत- जे लाजवतं, खाजवतं आणि माजवतं, ते हे साहित्य असतं... जर अशाच साहित्याचा धुमाकूळ आपल्या आसपास माजणार असेल तर विचार करायची गरज आहे !"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com