‘जयराज ग्रुप’ संस्थेला जमनालाल बजाज पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

पुणे - पुण्यातील तांदूळ आणि धान्य विक्रीतील ‘जयराज ग्रुप’ या व्यावसायिक संस्थेला जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 

पुणे - पुण्यातील तांदूळ आणि धान्य विक्रीतील ‘जयराज ग्रुप’ या व्यावसायिक संस्थेला जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या पुरस्काराचे मुंबई येथे नुकतेच वितरण झाले. याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट, फाउंडेशनच्या कल्पना मुन्शी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा, विनीत भटनागर, शेखर बजाज आदी उपस्थित होते. ‘जयराज ग्रुप’चे राजेश शहा, जयंत शहा, धवल शहा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘उचित व्यवहारांसाठी’ या संस्थेला तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. प्रभू यांनी विजेत्यांचे अभिनंदन करीत, ग्राहकांना त्यांच्या पैशाचा मोबदला मिळाला पाहिजे, तो त्यांचा हक्क असल्याचे प्रतिपादन केले. ‘‘या पुरस्कारांमुळे पुरस्कारार्थींची जबाबदारी वाढत असून, त्यामुळे उचित व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण वाढेल,’’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

बापट म्हणाले, ‘‘कायदा हा मोडण्यासाठीच असतो, हा गैरसमज दूर करण्यासाठी योग्य संस्कार होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींनी वाईट प्रवृत्तींच्या विरोधात उभे राहावे.’’

Web Title: jamnalal bajaj award gives to jairaj group