गुणवत्तेत जुन्नर तालुक्याची पुणे जिल्ह्यात आघाडी

दत्ता म्हसकर
बुधवार, 25 एप्रिल 2018

जुन्नर : समजपूर्वक वाचनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक, गणित उच्च स्तर भागाकारमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला असून जुन्नर तालुक्याने आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळविले असल्याचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०१७- १८ मध्ये पुणे जिल्हा परिषदेमार्फत  “पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रम” अंतर्गत प्रथम भाषा( मराठी व उर्दू) आणि गणित या विषयाच्या इ.१ ली ते ५ वी तील सर्व विद्यार्थ्यांची वाचन क्षमता तपासणी व गणितातील संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया याची पडताळणी क्लस्टर रिसोर्स ग्रुपमार्फत करण्यात आली होती .

जुन्नर : समजपूर्वक वाचनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक, गणित उच्च स्तर भागाकारमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला असून जुन्नर तालुक्याने आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळविले असल्याचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०१७- १८ मध्ये पुणे जिल्हा परिषदेमार्फत  “पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रम” अंतर्गत प्रथम भाषा( मराठी व उर्दू) आणि गणित या विषयाच्या इ.१ ली ते ५ वी तील सर्व विद्यार्थ्यांची वाचन क्षमता तपासणी व गणितातील संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया याची पडताळणी क्लस्टर रिसोर्स ग्रुपमार्फत करण्यात आली होती .

यामध्ये जुन्नर तालुका संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा अव्वलस्थानी आला आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, लोणी काळभोर यांनी केलेल्या विश्लेषणात जिल्ह्यातील १३ तालुक्यांची स्थिती दर्शविण्यात आली असून नुकतेच त्याचे सादरीकरण जिल्हास्तरावर करण्यात आले.

सदर अध्ययन समृद्धी उपक्रमाचा प्रथम टप्प्याच्या २३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ तपासणीत भाषा विषयात समजपूर्वक वाचनात ७३.३९ % विद्यार्थी होते त्यावेळी पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक होता. तसेच गणित विषयात भागाकार यात ४१.८६ % विद्यार्थी अचूक भागाकार करीत होते.दुसऱ्या टप्प्यात  पुणे जिल्ह्यात ४ था क्रमांक मिळवला होता.

अध्ययन समृद्धी उपक्रमाच्या दुसरा टप्प्यात ता. २६ ते ३० मार्च २०१८ या कालावधीत इयत्ता १ ली ते ५ वी तील सर्व विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. भाषा विषयात (मराठी व उर्दू) समजपूर्वक वाचन या उच्च स्तरात जुन्नर तालुक्यातील ८२.६९ % विद्यार्थी आढळून आले असून जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. गणित विषयात उच्च स्तर भागाकार या संख्या वरील क्रियेत जुन्नर तालुक्यात  ८२.३१ % विद्यार्थी अचूक भागाकार करत असल्याचे आढळून आले असून त्यात जुन्नर तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जुन्नर मधील आगर केंद्राची भरारी
जुन्नर तालुक्यातील आगर केंद्राने मुलांच्या समजपूर्वक वाचन या उच्च स्तरात ९७.९२ % मुले असून आगर केंद्राने पुणे जिल्हात ४ था क्रमांक मिळवला आहे, तसेच  गणित विषयात उच्च स्तर भागाकार या संख्या वरील क्रियेत आगर केंद्रातील  ९९.६७ % मुले अचूक भागाकार करीत असून पुणे जिल्हात आगर केंद्राचा २ रा क्रमांक आहे.

सूरज मांढरे , मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद पुणे , जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था , लोणीकाळभोर च्या प्राचार्य कमलजादेवी आवटे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे , संपर्क अधिकारी प्रा.राजेश बनकर या मान्यवरांकडून मिळालेली  प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका आघाडीवर राहिला आहे.

गुणवत्तेच्या या यशात शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी आणि सर्व विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , शिक्षक आणि विषय साधन व्यक्तींचे आणि शिक्षकांचे खरे योगदान आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा उपक्रम यशस्वी व परिणामकारक करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि  सततचा पाठपुरावा करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी सांगितले.

यापुढील काळात देखील विद्यार्थ्याची गुणवत्ता यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले . सभापती ललिता चव्हाण आणि उपसभापती उदय भोपे , जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आमच्या पाठींवर मारलेली कौतुकाची थाप यामुळे काम करण्यात एक वेगळी उर्जा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

Web Title: Junnar gets first number in quality of Education