78 वर्षीय कुसुमबाईंना घरपोच मोफत दैनिक सकाळ 

सुदाम बिडकर
शनिवार, 26 मे 2018

पारगाव - जारकरवाडी ता. आंबेगाव येथील कुसुमबाई बबन वाघमारे या 78 वर्षीय आजी जुनी चौथीपर्यंत शिकलेल्या असतानाही आजही त्यांनी वर्तमानपत्र वाचनाची आवड जोपासली आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने त्या दररोज वर्तमानपत्र विकत घेऊ शकत नसल्याने गावच्या सरपंच व तनिष्का सदस्या रुपाली भोजणे यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज त्यांच्या घरी दैनिक सकाळचा अंक देण्याची व्यवस्था केली आहे.

कुसुमबाई वाघमारे यांचा पीढीजात सुतारकामाचा व्यवसाय आहे. परंतु, या व्यवसायाला घरघर लागल्याने त्यांनी उदरनिर्वाहासाठी जुन्या कपड्यांपासुन गोधडी शिऊन देण्याचे काम सुरु केले. त्यांनी जुनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना वयाच्या 78 व्या वर्षीही चांगले वाचता येत आहे. त्या आपली वाचनाची आवड जोपसण्यासाठी वेळ मिळेल तश्या गावातील हॉटेल, दुकाण या ठिकाणी जाऊन वर्तमानपत्र वाचतात. परंतु, दररोज त्यांना ते शक्य होत नाही. आणी हलाखिच्या परिस्थितीमुळे त्या दररोज वर्तमानपत्र विकतही घेऊ शकत नाही. ही गोष्ट सरपंच रुपाली भोजणे यांना समजल्यानंतर त्यांनी कुसुमबाई वाघमारे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज त्यांच्या घरी दैनिक सकाळचा अंक देण्याची व्यवस्था केली आहे.

Web Title: Kusumbai's 78-year-old free daily sakal newpaper