कामगार आयुक्तालयाचे संकेतस्थळ बंद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पुणे - गेल्या दहा दिवसांपासून कामगार आयुक्तालयाचे संकेतस्थळ बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दुकान परवाना व मजूर ठेकेदार परवाना मंजूर होऊनही संकेतस्थळावर दिसत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

याबाबत दीपक शिंदे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी दुकान परवान्यासाठी अर्ज केला होता. तो मंजूर होऊन दहा दिवस झाले; परंतु संकेतस्थळावर अर्जच दिसत नाही. या संदर्भात आयुक्तालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले.’’ नीलेश गायकवाड म्हणाले, ‘‘पंधरा दिवसांपूर्वी मान्यता मिळूनही दुकान परवाना संकेतस्थळावर अपलोड केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळ बंद आहे.’’ कामगार सहायक आयुक्त निखिल वाळके म्हणाले, ‘‘मुंबई येथील मुख्य सर्व्हरमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे अडचणी येत आहेत. या संदर्भात महाऑनलाइन आणि नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला कळविले आहे. संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.’’

दोन दिवसांत संकेतस्थळ पूर्ववत 
गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळाच्या समस्यांबाबत मुंबईतील ऑनलाइन टीमला सूचित केले आहे. दोन दिवसांत संकेतस्थळ पूर्ववत होईल, अशी माहिती कामगार सहआयुक्त ब. रा. देशमुख यांनी दिली.