वीजपुरवठा कमी होत असल्याने योग्य त्या उपाय योजना करण्याची मागणी

जनार्दन दांडगे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

उरुळी कांचन (पुणे) : पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची या प्रमुख गावांच्यासह दौंड तालुक्यातील डाळिंब परीसरात मागिल कांही दिवसापासुन विज पुरवठा अंत्यत कमी क्षमतेने होत आहे. पुर्व हवेलीतुन वाहणाऱ्या दोन्ही कालव्यातील पाणी उशाला असुनही केवळ कमी क्षमतेच्या विज पुरवठ्यामुळे विज पंप चालत नसल्याने उस, भाजीपाला, फळशेती यासारखी सर्व प्रकारची पिके कोमजली जाऊ लागली आहेत.

उरुळी कांचन (पुणे) : पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची या प्रमुख गावांच्यासह दौंड तालुक्यातील डाळिंब परीसरात मागिल कांही दिवसापासुन विज पुरवठा अंत्यत कमी क्षमतेने होत आहे. पुर्व हवेलीतुन वाहणाऱ्या दोन्ही कालव्यातील पाणी उशाला असुनही केवळ कमी क्षमतेच्या विज पुरवठ्यामुळे विज पंप चालत नसल्याने उस, भाजीपाला, फळशेती यासारखी सर्व प्रकारची पिके कोमजली जाऊ लागली आहेत. एकीकडे सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठा तर दुसरीकडे कमी क्षमतेचा विजपुरवठा अशा दुहेरी संकटात पुर्व हवेलीतील विस हजाराहुन अधिक शेतकरी सापडले असुन, विज कंपनीने तातडीने योग्य त्या उपाय योजना न केल्यास शेतकऱ्यात उद्रेक होण्याची भिती निर्माण झाली आहे. 

पुर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोरसह वरील सर्व गावांना थेऊर (ता. हवेली) येथील केंद्रासह वळती फिडरच्या मदतीने शेतीसाठी व घरगुती वापरासाठी वीजपुरवठा केला जातो. मात्र मागील सहा महिन्यापासून वळती फिडरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमानात वाढले आहे.

त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरगुती वापर, शेती व उद्योगासाठी विजेची मागणी दिड पटीने वाढली आहे. वळती फिडर उभारताना, या फिडरवरुन तिनशे अॅम्पियरच्या आसपास विद्युत दाबाच्या विजेची मागणी होती. मात्र मागील पंधरा ते वीस वर्षाच्या काळात कृषी, घरगुती व उद्योगासाठी लागणाऱ्या विजेची मागणी पाचशे अॅम्पियर विद्युत दाबापार्यंत पोहचली आहे. क्षमतेपेक्षा दिडपट विजपुरवठा पाढल्याने, वळती फिडरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमानात वाढले आहे.

तर दुसरीकडे वळती फिडरचा विस्तार सुमारे नव्वद किलोमिटरच्या आसपास असल्याने, या फिडरवरुन होणारा विजपुरवठा अंत्यंत कमी दाबाने होत आहे. कमी बादाने पुरवठा व वारंवार बिघाड अशा दोन्ही संकटातुन मार्ग निघावा यासाठी, महावितरणने चार वर्षापूर्वी वळती फिडरचा काही भाग कोरेगाव मुळ उपकेंद्राशी जोडण्याचे नियोजन केले होते. मात्र पुणे-दौंड रेल्वेमार्गाच्या खालून थेऊरफाटा व उरुळी कांचन येथे विद्युतवाहक तारा टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळविण्यात महावितरण अपयशी ठरले आहे. महावितरणच्या नाकर्तेपणाचा फटका पूर्व हवेलीतील दहा हजाराहुन अधिक शेतकरी व या परीसरातील उद्योगधंद्यांना बसत आहे. 

नवीन मुळा-मुठा कालवा व जुना मुळा-मुठा कालवा (बेबी कालवा) या दोन्ही कालव्यातून मागिल कांही दिवसापासुन शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. मात्र कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने, विज पंप चालुत होत नाहीत. तर दुसरीकडे विज पुरवठा क्षमतेने चालु झालाच तर, वळती फिडरवरुन वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात होते. दोन्ही कालवे तुंडुब वाहत असतानाही, शेतकरी विज कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतीतील पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. याबाबत विज वितरण कंपनीकडे वारवांर पाठपुरावा करुनही, शेतकऱ्यांच्या हातात आश्वासनाशिवाय कांही मिळत नाही हे वास्तव आहे. हिंसक होण्यापुर्वीच शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत व पुर्ण क्षमतेने कसा देता येईल याचा लिचार करावा, असे संभाजी सर्जेराव महाडिक यांनी सांगितले. 

याबाबत महावितरणच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. बुदेंले म्हणाले, पुर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोरसह वरील सर्व गावामध्ये विज पुरवठा अंत्यत कमी क्षमतेने होत आहे ही बाब खरी आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी विज वितरण कंपनीने चार वर्षापूर्वी वळती फिडरचा काही भाग कोरेगाव मुळ उपकेंद्राशी जोडण्याचे नियोजन केले होते. मात्र पुणे-दौंड रेल्वेमार्गाच्या खालून थेऊरफाटा व उरुळी कांचन येथे विद्युतवाहक तारा टाकाण्यास रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने हे काम रख़डले आहे. मात्र शेतखऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन पुढील पंधरा दिवसात वळती फिडरवरुन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्याबरोबरच विज पुरवठा पुर्ण क्षमतेने कसा होईल याकडे लक्ष पुरवण्यात येईल.
 
याबाबत बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन, सोमवारी (ता. 16) महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावुन, पुढील आठवडाभऱात तात्पुरता विज पुरवठा सुरळीत कसा होईल याकडे लक्ष पुरवण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे वळती फिडरचा काही भाग कोरेगाव मुळ उपकेंद्राशी जोडण्यासाठी पुणे-दौंड रेल्वेमार्गाच्या खालून थेऊरफाटा व उरुळी कांचन येथे विद्युतवाहक तारा टाकण्यासंदर्भातील परवानगी मिळवण्यासाठी पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन, परवानगी मिळवणार आहे.

Web Title: For less electic supply demand for solution