मळवली स्थानकावर लोकल रेल्वे फुल्ल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

लोणावळा - सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळ्यासह ग्रामीण भाग पर्यटकांनी फुलला आहे. दरम्यान, रविवारी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याने पुणे-लोणावळा लोकललाही गर्दी होती. 

पर्यटकांची प्रचंड गर्दी व पावसाची संततधार यामुळे लोणावळा पोलिसांनी भुशी धरणावर जाण्यासाठी शनिवारी मज्जाव केला. त्यामुळे वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. मात्र, रविवारी पर्यटकांनी भुशी धरण व लोणावळा परिसरात प्रचंड गर्दी केली. विशेषतः कार्ला, भाजे लेणी, लोहगड परिसराला पर्यटकांनी पसंती दिली. भाजे धबधब्यावर भिजण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. लोकल रेल्वेला गर्दी झाली. मळवलीसह लोणावळा रेल्वे स्थानक पर्यटकांनी गजबजून गेले होते. तसेच, पर्यटकांच्या वाहनांमुळे नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी भुशी धरणाकडे जाणारा मार्ग कुमार रिसॉर्ट व रायवूड येथे बंद केला. सायंकाळी पाचच्या सुमारास भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना मनाई केली.