मदनवाडी ओढा खोलीकरण सामाजिक कार्याचा उत्कृष्ठ नमुना ठरेल : श्रीकांत पाटील

Madanwadi
Madanwadi

भिगवण : रोटरी क्लबच्या वतीने मदनवाडी गावांमध्ये करण्यात येत असलेल्या पन्नास लाख रुपयांच्या ओढा खोलीकरणाच्या कामामुळे मदनवाडी गाव पाणीदार होण्यास मदत होणार आहे. सामाजिक भावनेने हे काम करण्यात येत असुन या कामामध्ये अडथळा आणु नये. ग्रामस्थांनी पुढे येऊन या कामास सहकार्य केल्यास मदनवाडी ओढा खोलीकरण सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्यातुन केलेल्या सामाजिक सामाजिक कार्याचा उत्कृष्ठ नमुना ठरेल असा विश्वास इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केला.

येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने मदनवाडी (ता. इंदापूर) येथील पन्नास लाख रुपयांच्या ओढा खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, रवी धोत्रे, वसंत माळूंजकर, मीरा बरवीरकर, मारुती जाधव, मारुती वणवे, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष नामदेव कुदळे, महेश शेंडगे, वर्षा बोगावत, संपत बंडगर, संजय चौधरी, प्रदीप वाकसे, बाळासाहेब सोनवणे,तेजस देवकाते, सरपंच आम्रपाली बंडगर उपस्थित होते. श्री. पुढे पाटील म्हणाले, ओढा खोलीकरण करत असताना अनेकदा काही लोकांकडुन जमीन, रस्ता, पीक, आदी सबबी पुढे करुन अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो. मदनवाडी ओढा खोलीकरणाच्या कामामध्ये जाणीवपुर्वक कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. 

बारामती उपविभागिय पोलिस अधिकारी बापू बांगर म्हणाले, सामाजिक काम करत असताना अंहकाराचे जोडे बाजुला ठेवले पाहिजेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मदनवाडी येथे करण्यात येत असलेल्या या कामामध्ये कोणीही अहंकारमध्ये आणु नये व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख म्हणाले, रोटरी क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गावांनी त्यांच्या गरजानुसार ग्रामसभांच्या माध्यमातून ठराव करुन दिल्यास गावाच्या विकासाची अऩेक कामे रोटरी क्लबच्या माध्यमातून करता येतील. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रकाश ढवळे, रंगनाथ देवकाते, मीना बोराटे, प्रदीप गारटकर, विलास जगताप, रवी धोत्रे, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रियाज शेख यांनी केले सुत्रसंचालन सचिन बोगावत यांनी केले तर आभार तुकाराम बंडगर यांनी मानले.कार्यक्रमासाठी थॉमस मथाई, संजय खाडे, डॉ.अमोल खानावरे,रणजित भोंगळे,प्रवीण वाघ, आैदुंबर हुलगे यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com