मद्यावरील एलबीटीमुळे पालिकेस चौदा कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

पिंपरी - मद्यविक्रीवर एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पिपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात 14 कोटींची भर पडणार आहे, अशी माहिती विभागाचे सहायक आयुक्‍त डॉ. यशवंत माने यांनी दिली.

राज्य सरकारने एक ऑगस्ट 2015 पासून महापालिका हद्दीतील 50 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांचा एलबीटी रद्द केला. त्यामुळे मद्य उत्पादक व विक्रेत्यांनाही या करातून सवलत मिळाली होती. पर्यायाने पालिकेच्या महसुलात घट झाली.

2012-13 मध्ये पालिकेला जकातीपोटी मद्यावर 20 कोटी 82 लाख रुपये मिळत होते. त्यानंतर एलबीटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे पहिल्या वर्षात मद्यावरील एलबीटीचे उत्पन्न कमी होते. परंतु, 2014-15 मध्ये मद्यावरील एलबीटीपोटी 25 कोटी 43 लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर सरकारने 50 कोटींपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांचा एलबीटी रद्द केल्याने मद्यविक्रेत्यांना दिलासा मिळाला. पण पालिकेचे उत्पन्न घटले. ते 2015-16 मध्ये सात कोटी 59 लाखांवर आले होते.